ब्रेकिंग न्यूज

वाघाने गुराख्याचा पाडला फडशा ; वाघाच्या हल्ल्यात ७० वर्षीय वृद्धाचा मृत्यू 

Spread the love

चंद्रपूर / प्रतिनिधी 

 चिमूर तालुक्यातील पळसगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत विहीरगाव नियत क्षेत्र २ मधील कक्ष क्र, ८५८ मधील जंगलात वाघाने गुराख्यावर हल्ला करून  ठार केल्याची घटना आज शनिवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली.दयाराम लक्ष्मण गोंडाणे (७०) रा. विहीरगाव असे मृत्तकाचे नाव आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, चिमूर तालुक्यातील विहीरगाव येथील दयाराम लक्ष्मण गोंडाणे (७०) हा काही गुराख्यांसोबत जनावरे चारायला घेवून गेला होता. दबा धरून असलेल्या वाघाने गुराख्यावर हल्ला करून ठार केले. काही अंतरावर असलेल्या गुराख्यांना मृतक गुराख्याला वाघ तोंडात पकडून फरफटत नेत असल्याचे आढळून आले. त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेऊन प्रचंड आरडा- ओरड करून जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. लगेच मोबाईलव्दारे गावात व विभागाला माहिती देण्यात आली. नागरिक आणि वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. लगेच गुराख्याचे शोध मोहीम सुरू केली. काही अंतरावर मृतदेह मिळाला.

सदर परिसरात काही महिन्यांपासून वाघाचा वावर आहे. अनेक जनावरांचा फडशा पाडला आह. नागरिकांना दर्शन होणे नित्याचेच झाले आहे. त्यामुळे शेतकरी आणि शेतमजुरांमध्ये प्रचंड दहशत आहे. वनाधिकाऱ्यांनी मृत्तदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे नेण्यात आले. या वेळी, वनपरीक्षेत्र अधिकारी योगिता आत्रम,अमोल कवासे वनपाल,वनपाल विनोद किलनाके, निखूरे, वनरक्षक नागलोत, मेश्राम, खारडे, जिवतोडे, जरारे, गेडाम, दुधे, ठाकरे, पोलीस निरीक्षक संतोष बाकल सह पोलीस कर्मचारी वनविभागाचे कर्मचारी हजर होते.मृत्तकाच्या कुटुंबास वनविभागाच्या पन्नास हजाराची आर्थिक मदत करण्यात आली.त्याच्या मागे पत्नी,दोन मुले, एक मुलगी व मोठा आप्त परिवार आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close