क्राइम

पोलिसांचा छापा,  नशेत बेधुंद तरुण तरुणी अन्….

Spread the love
लोणावळा /विशेष प्रतिनिधी
                     बाहेर शहराच्या ठिकाणी शिकायला आलेल्या तरुण तरुणींवर कुटुंबाचे बंधन राहत नसल्याने ते या स्वातंत्र्याचा भलताच फायदा उचलत आहेत.  नुकतंच इथून एक धक्कादायक आणि विचित्र घटना समोर आली आहे. यात पोलिसांनी अचानक एका बंगल्यावर छापा टाकला आणि भयंकर कांड उघडकीस आलं. पोलीस आत पोहोचताच समोर ९ तरुण आणि ७ तरुणींचं ते कांड समोर आलं. याप्रकरणी 18 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणावळ्यात मौजमजेच्या नावाखाली हाय-प्रोफाईल आणि अश्लील पार्ट्यांचे पेव फुटले असून, अशाच एका नियमबाह्य धांगडधिंगा पार्टीवर लोणावळा शहर पोलिसांनी मध्यरात्रीच्या सुमारास धडक छापा टाकला.
लोणावळ्यातील त्या बंगल्यावर पोलिसांचा छापा (प्रतिकात्मक फोटो)
या छाप्यादरम्यान बंगल्यात अनेक तरुण-तरुणी मद्यपान करून अश्लील चाळे करत असल्याचे रंगेहाथ पकडले गेले. याप्रकरणी पोलिसांनी बेधुंद झालेल्या १६ तरुण-तरुणींसह बंगल्याचा मालक आणि केअरटेकर अशा एकूण १८ जणांविरोधात लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार (१५ जून) पहाटे दीडच्या सुमारास पोलिसांचे विशेष पथक परिसरात नेहमीप्रमाणे गस्तीवर होते. गस्त घालत असताना पोलिसांना भांगरवाडीतील ‘पुराणिक सोसायटी’च्या १३५ क्रमांकाच्या बंगल्यामधून गाण्यांचा आणि आरडाओरड्याचा आवाज येत असल्याचे निदर्शनास आले. मध्यरात्रीच्या वेळी सुरू असलेल्या या धांगडधिंग्याचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ कारवाईचे पाऊल उचलले.
मोठ्या आवाजात संगीत, दारूची नशा अन्..
पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तातडीने या १३५ नंबरच्या बंगल्याची नाकेबंदी करून आत प्रवेश केला. आतले दृश्य पाहून पोलीसही चक्रावून गेले. बंगल्यात अतिशय मोठ्या आवाजात संगीत लावून, दारूचे उघडपणे सेवन सुरू होते. मद्याच्या नशेत धुंद झालेले तरुण आणि तरुणी अश्लील कृत्य करत धुडगूस घालत होते. पोलिसांनी तात्काळ हे संगीत बंद पाडले आणि तिथे उपस्थित असलेल्या सर्वांवर गुन्हा दाखल केला.
ADVERTISEMENT
या कारवाईत पोलिसांनी या १६ पर्यटकांसह या बेकायदेशीर पार्टीला मूकसंमती देणारा बंगल्याचा मालक आणि तिथला केअरटेकर अशा एकूण १८ जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. लोणावळा आणि आसपासच्या परिसरातील बंगले तसेच फार्महाऊसवर मागील काही वर्षांपासून पर्यटनाच्या नावाखाली असे नियमबाह्य आणि बिभत्स प्रकार मोठ्या प्रमाणावर फोफावत चालले आहेत. मात्र, पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे लोणावळ्यातील फार्महाऊस आणि बंगले भाड्याने देऊन तिथे अशा पार्ट्यांचे आयोजन करणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close