सामाजिक

मेजर उध्दव टेकाम यांचा शामादादा कोलाम संघटनेच्या वतीने सत्कार.

Spread the love

 

घाटंजी तालुका प्रतिनिधी -सचिन कर्णेवार

पो.स्टे घाटंजी येथील मेजर उध्दवजी टेकाम साहेब यांनी मुद्देमाल निर्गतीत व उत्कृष्ट कामगिरी करून जिल्ह्यात प्रथम स्थान मिळवीले आहे.या निमित्ताने जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड, अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप यांच्या हस्ते चषक व प्रमाणपत्र देऊन साहाय्याक पोलिस निरीक्षक सुषमा बावीस्कर व उध्दव टेकाम यांना सन्मानित करुन घाटंजी पोलीस ठाण्याचा गौरव करण्यात आला. याच प्रसंगाचे औचित्य साधुन आदिम जमात क्रांतिवीर शामादादा कोलाम संघटना घाटंजी च्या वतीने शाल श्रीफळ देऊन उध्दव टेकाम यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आदिम जमात क्रांतिवीर शामादादा कोलाम संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सुदर्शन भाऊ आत्राम, व घाटंजी तालुका अध्यक्ष विलास भाऊ कुमरे, तालुका उपाध्यक्ष ईश्वर भाऊ आत्राम,तालुका सदस्य काशिनाथ भाऊ आत्राम, सौ.टेकाम मॅंडम यांच्यासह ईतरही पदाधिकारी उपस्थित होते.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close