टूडेज चाणक्य च्या पोल ने उडवली महाविकास आघाडीची झोप
मुुबई / नवप्रहार डेस्क राज्यातील मतदानाच्या दिवशीच मतदान संपल्यावर काही संस्थांनी एक्झिस्ट पोल जाहीर केले आहेत. त्यापैकी जास्त एक्झिस्ट पोल चा निकाल महायुतीच्या बाजूने आहे. पण टूडेज चाणक्य च्या पोल ने जी आकडेवारी जाहीर केली आहे त्यामुळे महाविकास आघाडीची झोप उडल्या शिवाय रहात नाही. कारण या संस्थेने महायुतीला १७५ जागा दिल्या आहेत. यात 11 जागा कमी जास्त होऊ शकतात असे म्हटले आहे. यावर खा.संजय राऊत यांनी एक्झिस्ट पोल फ्रॉड असल्याचे म्हटले आहे। विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबरला मतदान झाल्यानंतर राज्यातील सर्वांच्या नजरा निकालाकडे कडे लागल्या आहेत. मतदानादिवशीच अनेक संस्थाचे एक्झिट पोल जाहीर झाले यात बहुतांश पोलमध्ये महायुतीला बहुमत मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
पण आता मतदान झाल्यानंतर दुस-या दिवशी टुडेज चाणक्यचा एक्झिट पोल जाहीर झाला आहे. या संस्थेने 2014 च्या लोकसभा निवडणूक अचूक अंदाज वर्तवला होता. आता विधानसभेला या एक्झिट पोलचा अंदाज खरा ठरणार का ते याकडे सर्वांचे लक्ष आहे.
टुडेज चाणक्यच्या पोलनुसार राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येऊ शकते. या एक्झिट पोलनुसार भाजप महायुतीला १७५ जागा तर 11 जागा कमी जास्त होऊ शकतात असे सांगण्यात आले आहे तर महाविकास आघाडीला 100 (11 जागा कमी जास्त) जागा मिळतील. तर अपक्ष आणि इतरांना 13 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
या एक्झिट पोलमध्ये कुणाला किती मते मिळतील याचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे, पोलनुसार महायुतीला 45 टक्के, महाविकास आघाडीला 39 टक्के तर इतरांना 16 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. तर पोल ऑफ पोलनुसार राज्यात महायुतीला 155 तर महाविकास आघाडीला 112 जागांवर समाधान मानावे लागण्याची शक्यता आहे. 11 जागा या इतरांना मिळतील असा पोल्स ऑफ पोलचा अंदाज आहे.
दरम्यान शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी एक्झिट पोल हा फ्रॉड आहे, म्हणत महाविकास आघाडीच्या विजयाच्या आणि सत्ता स्थापनेचा विश्वास व्यक्त केला आहे.
संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले होते की, एक्झिट पोल फ्रॉड आहे. हरियाणामध्ये काँग्रेस 60च्या वर जागा येईल असा पोल होता, पण तसं झालं नाही लोकसभेला 400 पारचे पोल होते, पण पोलचा अंदाज चुकला.