ब्रेकिंग न्यूज

रिसॉर्ट मध्ये सापडला तिघांचा मृतदेह 

Spread the love
11 वर्षाच्या मुलीचा समावेश 
कोडागु (कर्नाटक ) / नवप्रहार मीडिया 
                      पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या कोडागु (कर्नाटक ) येथील एका रिसॉर्ट च्या खोलीत  केरळ मधून सहलीसाठी आलेल्या एकाच कुटुंबातील तीघांचा मृतदेह सापडल्याने खळबळ माजली आहे. मृतांमध्ये रिसॉर्ट मध्ये असलेल्या पती -पत्नी आणि 11 वर्षीय मुलीचा समावेश आहे.
 याप्रकरणी पोलिसांनी तत्काळ धाव घेत चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली.
केरळच्या कोट्टायम येथील रहिवासी असलेले विनोद (43), पत्नी झुबी अब्राहम (37) आणि मुलगी जोहान (11) हे कोडागू येथील एका रिसॉर्टमध्ये फिरण्याकरता आले होते. या कुटुंबाने शनिवारी जंगल आणि डोंगराळ प्रदेशातील पर्यटकांमध्ये लोकप्रिय असलेल्या रिसॉर्टमध्ये चेक इन केले. परंतु,  त्यांचा मृतदेह खोलीत आढळून आला. पोलिसांनी चौकशी केली असता हे आत्महत्येचं प्रकरण असल्याचं समोर आलं. कारण, त्यांना या खोलीत सुसाईड नोट सापडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या जोडप्याने आधी आपल्या 11 वर्षीय मुलीची हत्या केली. त्यानंतर, दोघांनी आत्महत्या केली. तसंच, सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी आर्थिक विवंचनेचं कारण दिलं आहे. ते अत्यंत आर्थिक अडचणींचा सामना करत होते, असं पोलिसांनी म्हटलं आहे. दरम्यान, पोलिसांनी कुटुंबाच्या नातेवाईकांशी संवाद साधला असून पुढील अधिक चौकशी सुरू केली आहे. क्विझ
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close