गुन्हेशाखा, युनिट क्र. ३ यांची कामगिरी :- प्रतलाल विक्री करीता प्रतिबंधीत तंबाखु साठा करणाऱ्या आरोपींना अटक,
१८,५४,३०८ /- रू चा मुद्देमाल जप्त
दिनांक. १३.०५.२०२३ चे १९.४० वा. ते दि. १४.०५.२०२३ चे ०१.०५ वा. चे दरम्यान पोलीस ठाणे लकडगंज हद्दीत येनुकर बिल्डींगचे पार्किंग मधील रूमचे आत तसेच वाहनात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेले तंबाखुजन्य पदार्थ तसेच कच्चा माल व पॅकिंग प्रिंटींग, सिलींग साहित्य, विक्री करीता साठा करून ठेवल्याचे खात्रीशीर माहिती वरून गुन्हेशाखा यनिट क. ३ चे अधिकारी व कर्मचारी यांनी सापळा रचुन धाड टाकली असता नमुद ठिकाणी आरोपी १) रूपेश अरूण नंदनवार वय ३४ वर्ष रा. गोळीबार चौक, पोलीस ठाणे तहसिल, नागपूर २) दत्तु बबनराव सराटकर वय ३८ वर्ष रा. जुनी शुक्रवारी, तेलीपुरा, पोलीस ठाणे कोतवाली, नागपूर यांचे ताब्यातुन २२ बोरे / पोते विवीध प्रकारचें संगंधीत प्रतिबंधीत तंबाखु तसेच तंबाखुचे पॅकिंग, सिलींग, वजन व प्रिंटींग याच्या विवीध प्रकारच्या मशीनी तसेच तंबाखु पॅकींग करीता लागणारे खाली पॅकेट, बॉक्स, झाकने, व खरडे आणि मारोती ओमनी गाडी क. एम.एच ३१ डी. के ९२२६ असा एकुण १८,५४,३०८/- रू चा मुद्देमाल मिळुन आला. मुद्देमाल जप्त करून आरोपींविरूध्द पोलीस ठाणे लकडगंज येथे पोउपनि मधुकर कोठाके यांनी दिलेल्या तक्रारीवरून कलम १८८, २७२, २७३, ३२८, भा.दं.वी सहकलम ५९, अन्न व सुरक्षा मानदे अधिनीयम अन्वये गुन्हा नोंदवुन दोन्ही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. त्यांचा पाहीजे साथिदार आरोपी नामे दुर्गेश अग्रवाल रा. मानकापूर याचा शोध सुरू आहे. आरोपींना मुद्देमालासह पुढील योग्य कारवाईस्तव लकडगंज पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
वरील कामगिरी मा. पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन) श्री मुम्मका सुदर्शन, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. मनोज सिडाम, यांचे मार्गदर्शनाखाली, पोनि महेश सागडे, सपोनी. पवन मोरे, पोउपनि मधुकर कोठाके व पथकातील अंमलदार यांनी केली.