सामाजिक

हिवरखेड येथील वि.हिं.प बजरंग दलाने, व जय बजरंग क्रीडा मंडळ हिवरखेड येथे केला, बळीराजाचा सन्मान

Spread the love
हीवरखेड (मोर्शी)/ नवप्रहार डेस्क
उत्कृष्ठ सजावट व सुदृढ बैलजोडी स्पर्धा मध्ये एकुण 150 बैलजोडीचा सहभाग* मोर्शी तालुकयातील हिवरखेड येथे पारंपारीक पोळा हा सण मोठ्या प्रमाणात साजरा करतात हा सण विषेता: बळीराजाला समर्थ साथ देणाऱ्या गोवंशा करीता असतो बैलांची सजावट व पुजन करूण ४.वा. गुजरी बाजार येथे तोरणाखाली उभे असतात. त्यानंतर गावातील मानाची पाटलांची जोडी वाजत गाजत येवुन पुजन व महाआरती करुन तोरण तोडतो.व पोळा उत्सव साजरा होतो त्या आधी दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा _ विहिंप व बजरंग दल द्वारा आयोजीत स्पेर्ध मध्ये एकूण 150 बैलजोडीचा सहभाग होता मान्यवरांचे हस्ते जोडयाचे निरीक्षन करून प्रथम क्रमांकाचे बक्षिस श्री. बाबासाहेब धरमकर यांचे कडुन 3111रु रोख व सविताताई गो. मालपे सरपंच हिवरखेड व निलेश भाऊ शिरभाते तर्फे विजेत्या जोडीस शिल्ड व कृषीप्रिनियर्स फार्मर प्रोडूसर कंपनी हीवरखेड व सागर भाऊ  डवरे तर्फे विजेत्या जोडिस प्रतिमा भेट प्रथम क्रमांकाचे बक्षीस श्री.शंकरराव रिठे यांना देण्यात आले. द्वित्तीय क्रमांकाचे बक्षिस  स्व.श्री. विठ्ठलराव शिंदे स्मृती पित्यर्थ  श्री.मुकेश विठ्ठलराव शिंदे यांच्यातर्फे 2111 रु श्री. अजबराव पवार यांना देण्यात आले.
तृतीय क्रमांकाचे बक्षिस स्व.वासुदेवराव शिरभाते यांचे स्मृती प्रित्यर्थ श्री. निलेश वा. शिरभाते यांचे तर्फे 1111रु . श्री.अनिल भाऊ वासनकर यांना देण्यात आले. चतुर्थ बक्षीस स्व.श्री. रामभाऊजी सुखसोहळे स्मृति पित्यर्थ चि. प्रज्वल भाऊ सुखसोहळे यांचे तर्फे 999 रु श्री.संतोषराव पाचारे यांना देण्यात आले व इतर 36 बैलजोडी मालकास प्रोत्साहनपर बक्षिस प्रत्येकी 501 रु रोख देण्यात आले. व सत्कारमूर्ती चि.मयूर श्री.गावंडे PSI पदी नियुक्ती व श्री.सतिश भाऊ महल्ले(पाटील) पोळ्याचा परंपरागत मान यांचा बजरंग दल तर्फे सत्कार करण्यात आला.व या कार्यक्रमाला उपस्थित साै.सविताताई गो.मालपे लो.सरपंच हिवरखेड श्री. सचिन तायवाडे उपसरपंच श्री हरीभाऊजी सुखसोहळे श्री.शर्मा भाऊसाहेब श्री. बाबासाहेब धमकर श्री. नंदुभाऊ गांधी श्री . नारायणराव राजगुरे श्री.अरुणराव पाटील श्री. श्री.नीलेशभाऊ शिरभाते श्री.साहेबरावजी वानखडे श्री. मोहनभाऊ पाचारे, अनिल भाऊ भुंते,श्री. सुरेंन्द्र भाऊ गणोरकर श्री. शंकरराव अमृते, मनोज भाऊ मोकलकर, गोपाल भाऊ मालपे जितेंद्र फुटाणे, मान्यंवराची उपस्थिती होती. सचिन तायवाडे,शंकर पाचारे,राहुल श्रीराव, अमोल पाचारे,निखिल सुखसोहळे, प्रफुल पाचारे, निकेश वैराळे, मनोज अजमिरे, नितीन पवार, मिलिंद शिरभाते, वैभव दरोकर,शुभम तडस, विशाल सुखासोहळे,रवी सरियाम इतर बंजरग दलाच्या कार्यकत्यांनी कार्यक्रृमाचे यशस्वी आयोजन केले.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close