सामाजिक
भोई समाजाणे संत भीमा भोई यांची जयंती कोळी खुर्द येथे उत्साहात केली साजरी.
घाटंजी तालुका प्रतिनीधी- सचिन कर्णेवार
घाटंजी तालुक्यातील कोळी खु.येथे संत भीमा भोई महाराज यांची१७५ वी जयंती मोठ्या उत्साहात गुरुवार दी.२५ मे २०२३ रोजी साजरी करण्यात आली. सर्व प्रथम संत भीमा भोई महाराजांच्या प्रतिमेचे पुजन व माल्याअर्पण महाराष्ट्र प्रदेश भोई समाज सेवा संघाचे जी.अध्यक्ष मारोतराव पडाळ यांचे शुभहस्ते अर्पण करून अभिवादन करण्यात आले व गावातील प्रतिष्ठीतांच्या उपस्थित संत भीमा भोई महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने भोई समाज बांधवांनी महाप्रसादाचे आयोजन ही केले होते. गेल्या काही वर्षांपासून भोई समाज बांधव एकत्र येऊन मोठ्या उत्साहात संत भीमा भोई महाराज यांची जयंती साजरी करत असून या जयंतीच्या निमित्ताने प्रत्येक भोई समाज बांधव घरावर तसेच चौक चौकात संत भीमा भोई महाराजांचे ध्वज लावण्यात आले व भव्य मिरवणूक देखील काढण्यात आली. तसेच संत भीमा भोई महाराजांचे चौकात सर्व उपस्थित मान्यवरांचा व भोई समाजातील ‘एक अघोरी’ चित्रपट कलाकार अमर नामदेव सातघरे यांचा ही समाजातर्फे पुष्पगुच्छ देऊन सत्कार व गौरव करण्यात आला. मूळ मानवतावादी विचारांचे संत भीमा भोई यांचा जन्म २५ मे१८५० रोजी ओडिसा राज्यात झाला होता. विशेष म्हणजे दोन्ही डोळ्याने अंध असुनही त्यांणी भोई समाजासह ईतर समाजाला बोध मिळावा यासाठी सदेव समाज प्रबोधन केले.त्यांची काही घोष वाक्य लिहलेत ते आजही मानवता शिकवण देऊन जातात. “भले मुझे नरक मिले पर जगत का कल्याण हो!” असे बाल ब्रह्मचारी संत भीमा भोई महाराज समाजातील कृप्रता नष्ट व्हावी यासाठी सतत प्रयत्न करत राहीले.त्यांनी समाजाला मानवतेचा संदेश दिला. हा जयंती उत्सव कोळी (खु.) येथील भोई समाजाच्या ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. कार्यक्रम आयोजन भोई समाज संघटन युवा अध्यक्ष गजानन महादेव मोहजे,अजय गाढवे, गणेश गिनगुले यांच्या सह भोई समाज युवा संघटनेचे संपूर्ण सदस्य व महीला मंडळ तसेच भोई समाज बांधवांणी कार्यक्रम यशस्वीतेसाठी मोलाचे परिश्रम घेतले.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1