राजकिय

रामदास पाटील सुमठाणकर कर्तव्यदक्ष व उच्चविद्या विभुशीत नेतृत्व

Spread the love

महागाव तालुका प्रतिनिधी
किशोर राऊत

हिंगोली लोकसभा मतदार संघाचे भावी उमेदवार रामदास पाटील सुमठाणकर हे उच्च विद्या विभूशीत उमेदवार म्हणुन उदयास येत आहेत त्यांनी शासकीय सेवेत काम करताना जनतेमध्ये राहून समस्या सोडविल्या असल्याने ते लवकरच जनतेमध्ये लोकप्रिय झाले आहे सेवेच्या कार्यकाळात समजोपयोगी कामे करुण जनतेच्या समस्याचे निराकरण केले आहे त्यांना सामाजिक कार्याची आवड व प्रशासकीय सेवेचा अनुभव यांची सांगड घालून त्यांनी अनेक समजोपयोगी कामे केली आहे शासनाचे जनतेच्या हितासाठी असणारे उपक्रम धड़ककृतीतुन प्रभावीपणे राबविल्यामुळे त्यांचे जनतेमध्ये अजरामर कार्य आहे सामाजिक सेवेची आवड असल्याने आपल्या प्रशासकीय पदाचा राजीनामा देऊन जनतेची सेवा आपल्या हातुन व्हावी या उदातहेतुने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन समाजकार्यासाठी राजकारणाच्या आखाड्यात हिंगोली लोकसभा मतदार संघातुन लोकसभेची निवडणुक लढविण्यास सज्ज झाले आहे हिंगोली लोकसभा मतदार संघात त्यांनी कर्यकर्ते व जनता यांच्याशी संपर्क वाढवून कार्यकर्ते व जनतेच्या समस्या ऐकून घेऊन त्या सोडविण्यासाठी पराकाष्टा करीत आहेत त्यांनी आजतागायत मोठ्या प्रमाणात जनसंपर्क वाढविल्यामुळे आज पर्यंत विरोधी पक्षांनी आपला संभाव्य उमेदवार जाहीर न केल्याने रामदास पाटील सुमठाणकर यांचा हिंगोली लोकसभा मतदार संघाचा विजयाचा रथ कोणीही रोखू शकणार नाही व यासाठी कोणत्याही राजकीय भविष्यवेत्याला विचारण्याची गरज पडणार नाही

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close