सामाजिक

धामणगांव कृषि उत्पन्न बाजार समिती, धामणगांव रेल्वे उपबाजार आवार मंगरुळ दस्तगीर येथे गुरांचा बाजार शुभारंभ

Spread the love

धामनगाव रेल्वे 

 

   धामणगांव कृषि उत्पन्न बाजार समिती अंतर्गत उपबाजार आवार मंगरुळ दस्तगीर येथे आज गुरुवार दि.२२/०२/२०२४ रोजी गुरांचा बाजार भरविण्याचा शुभारंभ मा.प्रा. विरेन्द्र जगताप (माजी आमदार धामणगांव विधानसभा क्षेत्र) यांचे शुभहस्ते करण्यात आला. 

अध्यक्ष स्थानी बाजार समितीच्या सभापती सौ. कविता श्रीकांत गावंडे होत्या,कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंगरुळ दस्तगीर सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष तथा कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक रवि भुतडा यांनी केले. यावेळी मंचावर प्रा. विरेन्द्र जगताप जिल्हा मध्य सह. बँकेचे संचालक श्रीकांत गावंडे, माजी जिल्हा परिषद सभापती सुरेश निमकर, बाजार समिती सभापती सौ कविता श्रीकांत गावंडे, उपसभापती मंगेश बोबडे, मंगरुळ दस्तगीर चे सरपंच सतिश हजारे, उपसरपंच गिरीष सुरोसे, पंचायत समिती सदस्या सौ माधुरीताई दृधे, संचालक रवि भुतडा, डॉ प्रमोद रोधे, विपीन ठाकरे, सौ चंदा रा. निस्ताने, सी संगीता सं. गाडे, संदीप दावेदार, दिनेश जगताप, भाऊराव बमनोटे, मुकुंद माहोरे, विलास भिल उपस्थित होते. बाजार समितीच्या सभापती सौ कविता श्रीकांत गावंडे यांनी मनोगत व्यक्त करीत असतांना सांगितले की, मंगरुळ द येथील सरपंच सतीश हजारे व गावकरी मंडळींनी सतत पाठपुरावा करुन मंगरुळ दस्तगीर येथे जनावरांचा बाजार भरविणे साठीचा आग्रह लावुन धरला. त्यामध्ये संचालक रवि भुतडा तसेच श्री विपीन ठाकरे, विलास भिल यांचा सुध्दा सिंहाचा वाटा आहे. आज आपल्या सर्वांचे नेते मा.प्रा. विरेन्द्र जगताप यांचे हस्ते शुभारंभ होत असल्याने मला अतिशय आनंद होत आहे व त्यामध्ये मला संपूर्ण संचालक मंडळाचे सहकार्य लाभले. आज रोजी मंगरुळ दस्तगीर वासीयांची मागणी पूर्ण करण्याचा मला सार्थ अभिमान वाटतो. यापुढे दर गुरुवारला जनावरांचा बाजार भरविण्यात येणार आहे अशी माहिती दिली.

मा.प्रा. विरेन्द्र जगताप यांनी आपले मनोगतामध्ये आजची शेतक-यांची स्थिती व जनावरांचे पालन पोषण करणे शेतक-यांना किती कठीण आहे. तसेच शासनाचे धोरणावर आपल्या तिव्र भावना व्यक्त केल्या. मी कायम आपल्या सुख दुखात सोबत राहणार असल्याचे मत व्यक्त केले

  याप्रसंगी प्रशांत सबाने, अविनाश इंगळे, रमेशराव शेंडे, यशवंत बोरकर, गुरुदास ढाकुलकर, संजय निमकर, यांचे सह असंख्य मंगरुळ दस्तगीर येथील व परिसरातील नागरीक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन बाजार समितीचे सचिव प्रविण वानखडे व आभार प्रदर्शन संचालिका सौ. चंदा रामदास निस्ताने यांनी केले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

Pande Sanjay

Related Articles

Back to top button
Close
Close