सामाजिक

पत्नीच्या त्रासाला कंटाळून त्याने केली आत्महत्या पण मृत्यूपूर्वीच्या VDO मध्ये असे बोलला की तुम्हालाही वाटेल वाईट

Spread the love
 
लखनौ / विशेष प्रतिनिधी 
            सोनू नावाच्या अवघ्या 21 वर्षीय तरुणाने आत्महत्या करत आपले जीवन संपवले आहे. त्यापूर्वी त्याने बनवलेल्या 2 मिनिटांच्या व्हिडिओ मध्ये तो हमसून हमसून रडताना दिसत आहे. तो म्हणतो माझ्या मृत्यूसाठी मीच जबाबदार आहे. पत्नीला आई तिच्या कुटुंबियांना यासाठी जबाबदार धरू नका. आणि त्यांना त्रास देऊ नका.
जीव देण्यापूर्वी तरुणानं दोन मिनिटांचा व्हिडीओ केला. त्यात तो हमसून हमसून रडत स्वत:च्या कुटुंबाची माफी मागताना दिसत आहे. आपली पत्नी निर्दोष असल्याचं तो वारंवार सांगत आहे. तिला कोणीही त्रास देऊ नका, अशी विनवणी त्यानं जीव देण्यापूर्वी केली. ही घटना उत्तर प्रदेशच्या आग्रा जिल्ह्यातील रकाबगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या ईदगाह कुतुलपूर भागात घडली.
२१ वर्षांच्या सोनू कुमारनं मंगळवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास राहत्या घरात जीवनयात्रा संपवली. घटनेची माहिती मिळताच पोलीस पोहोचले. त्यांनी सोनूचं शव ताब्यात घेऊन ते उत्तरीय चाचणीसाठी पाठवलं. जीव देण्याआधी सोनूनं त्याच्या मोबाईलमध्ये एक व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. घरगुती वादातून सोनूनं आयुष्य संपवल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.
मी आता दारु प्यायलो आहे. आता मला आता हे सगळं सहन होत नाही, असं सोनूनं व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. ‘कोणीही माझ्या बायकोला त्रास देऊ नका. ती आपल्या घरी राहील किंवा माहेरी जाईल. पण तिच्यावर कोणतीही कारवाई होऊ नये. मी गेल्यावर माझ्या पत्नीला तिच्या मर्जीनं जगू द्या,’ अशी अखेरची इच्छा सोनूनं बोलून दाखवली. सोनूचा व्हिडीओ पाहून कुटुंबाला अश्रू अनावर झाले.

माझ्या मृत्यूला माझी बायको जबाबदार नसल्याचं सोनूनं व्हिडीओमध्ये अनेकदा म्हटलं आहे. ‘चूक माझी होती. मी लग्न केलं. मी प्रेम केलं. याची शिक्षा मला मिळायला हवी, तिला नको. तिच्या कुटुंबियांनादेखील काही बोलू नका,’ असं सोनूनं अखेरच्या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.

सोनूने आपल्या मृत्यूनंतर पत्नीला कोणीही त्रास होऊ नये अशी विनंती केली आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close