मुलानेच केली म्हाता-या आईची हत्या
वरूड/तूषार अकर्ते
बेनोडा पोलिस स्टेशन हद्दीतील सांवगा येथे पोटच्या मुलानेच आपल्या म्हाता-या आईला कुठल्यातरी शस्त्राने मारहाण करून हत्या केली असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मुतकाचा पंचनामा करून मूतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीन रूग्णालयात पाठवण्यात आला आहे. सदरील प्रकरणी शिल्पा भोजराज आंडे (३५) रा.ग्राम सावंगा यांनी फिर्याद दिली आहे कि दि.१ जुलै रोज शनिवार ला रात्रीच्या वेळी सावंगा येथील रजियाबी मस्तान शाह (७०) रा. सावंगा यांना त्यांचा मुलगा मंजूर मस्तान शाह (४०) रा.सावंगा याने कौटुंबिक कारणावरून कोणत्यातरी शस्त्राने मारहाण करून हत्या केली आहे.अशा फिर्यादी वरून पोलिसांनी आरोपींविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास बेनोडयाचे ठानेदार स्वप्निल ठाकरे यांच्या मार्गदर्शनात पोलिस करीत आहे.