क्राइम

घरातून येत होती दुर्गंधी , शेजाऱ्यांनी पोलिसांना दिली माहिती अन् ….

Spread the love

गोरेगाव ( मुंबई ) / प्रतिनिधी

                    गोरेगाव पश्चिम परिसरातील मोतीनगर येथे एका घरातून दुर्गंधी येत असल्याने नागरिकांनी याबद्दल पोलिसांना माहिती दिली. पोलिस घटस्थळी दाखल झाले. घराचे दार उघडून आत गेले. संपूर्ण घर शोधले पण काहीच सापडले नाही.शेवटी बेड ची तपासणी केली असता त्यात महिलेचा मृतदेह आढळून आला. तिचा पती पसार झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील गोरेगाव पश्चिम येथील मोतीलाल नगर येथील एका व्यक्तीने पत्नीची हत्या केली आणि तिचा मृतदेह बेडमध्ये लपवून फरार झाला. घरातून दुर्गंधी येऊ लागल्यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. सुरुवातीला पोलिसांना लगेच मृतदेह सापडला नाही. त्यानंतर पोलिसांनी घरातील बेडची तपासणी केली असता महिलेचा मृतदेह आत लपवून ठेवल्याचे आढळून आले.

याप्रकरणी पोलिसांनी पतीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. हत्येचे कारण अस्पष्ट असून महिलेच्या पतीला अटक केल्यानंतर त्यामागचा हेतू स्पष्ट होईल. पोलिसांनी महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सिद्धार्थ रुग्णालयात पाठवला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close