चुलत मेहुणी सोबत एक रात्र घालवण्यासाठी त्याने पत्नी सोबत केले असे

लखनौ / नवप्रहार ब्युरो
सुखी संसार सुरू पती आणि पत्नी पैकी कोणी तरी अनैतिक संबंधात अडकतो. आणि मग आपले प्रेम मिळवण्यासाठी यापैकी एक या स्तराला जातो की दोघांपैकी कोणीतरी एखाद्याची हत्या करतो. आणि मग आयुष्य तुरुंगात सडतो. नेमका असाच प्रकार या प्रकरणात घडला आहे.
एका व्यक्तीला त्याच्या चुलत मेहुणीसोबत अनैतिक संबंध ठेवायचे होते. बायकोला जेव्हा या बद्दल समजलं, त्यानंतर घरात रोज भांडणं सुरु झाली.पत्नीने पतीच्या वाईट हेतूला विरोध सुरु केला. उत्तर प्रदेशच्या लखनऊमधील हे प्रकरण आहे. मोहनलालगंज भागात संजय पत्नी सविता सोबत राहत होता. संजयला त्याच्या चुलत मेहुणीसोबत संबंध ठेवायचे होते. म्हणून संजयने टोकाच पाऊल उचललं.
पोलिसांसमोर आरोपी संजयने सर्व सत्य सांगून टाकलं. “साहेब, मला माझ्या चुलत मेहुणीसोबत एक रात्र घालवायची होती. तिच्यासोबत अनैतिक संबंध ठेवायचे होते. पण सविताला याबद्दल समजल्यानंतर तिने घरात क्लेश, माझ्याशी भांडण सुरु केलं” असं संजय म्हणाला. “मी विचार केला की, सवितालाच मार्गातून हटवलं तर?. मग, मला माझ्या मेहुणीसोबत संबंध ठेवता येतील” असं संजय म्हणाला. प्लाननुसार, सोमवारी औषध देण्याच्या बहाण्याने सविताला घराच्या बाहेर बोलावलं. काहीतरी बहाणाकरुन तो तिला गोसाईंगंज येथे एका तांत्रिकाकडे घेऊन आला. तिथून परतताने संजयने पूरनपुर गावाजवळ सविताच्या डोक्यात दगड टाकला. जखमी होऊन सविता जमिनीवर कोसळली. त्यावेळी त्याने साडीने गळा आवळून तिची हत्या केली.
एकच खळबळ उडाली
सोमवारी संध्याकाळी पूरनपुर गावाजवळ सविताचा मृतदेह मिळाल्याने एकच खळबळ उडाली. पोलिसांना चौकशीत समजलं की, हत्या सविताचा नवरा संजयने केली आहे. सविताचे वडील राम नरेश यांनी या प्रकरणात नवरा संजय, दीर अजय आणि सासू-सासऱ्यांविरोधात हत्येचा गुन्हा नोंदवला.
रक्ताने माखलेला दगड
हत्या केल्यानंतर त्याने सविताचा मृतदेह किसान पथच्या किनाऱ्यापासून 20 फूट खाली फेकला. पोलीस त्याला घटनास्थळी घेऊन गेले. त्यावेळी हत्येसाठी वापरलेला रक्ताने माखलेला दगड सापडला.
तांत्रिकाकडे का नेलेलं?
आरोपी पती संजयने सांगितलं की, तो पत्नी सविताला तांत्रिकाकडे घेऊन गेला होता. यामागे काय कारण होत? त्याचा पोलीस तपास करत आहेत. पोलिसांनी सांगितलं की, तांत्रिकाबद्दल माहिती गोळा केली जात आहे. हत्येत त्याचा सहभाग आढळला, तर त्याच्याविरुद्ध सुद्धा कारवाई केली जाईल. संजयच्या आई-वडिलांची सुद्धा चौकशी सुरु आहे.