पारवा मार्गावर अपघाताचे सत्र सुरुच
अपघातात घोटी येथिल माजी सैनिकाचा मृत्यू
घाटंजी ता प्रतिनीधी- सचिन कर्णेवार
दिनांक ६/५/२०२५ रोजी पारवा गावाजवळ दूचाकी अपघात झाला. यात घोटी गावाचे सुपुत्र (माजी सैनिक) महादेवराव आत्राम (सी.आर.पी.एफ) यांना जबर मार लागला.सदर अपघातात जख्मीला उपस्थितिंनी पारवा ग्रामिण रुग्णालयात नेले असता अपघातातील जख्मीला गंभिर मार असल्याने यवतमाळ येथे हलविण्यात सांगतीले यात उपचारासाठी यवतमाळ येथे नेत असतांना घोटी येथल अपघातातील जख्मी माजि सैनिक अत्राम यांचा वडगाव जवळ मृत्यू झाला. पारवा येथिल बंद पेट्रोल पंप जवळील स्थळा जवळचा हा चौथा अपघात असून याआधिही याच ठिकाणी झालेल्या अपघातात एकाला नाहक जिव गमवावा लागला. अवैध वाहतूक व खुल्या पेट्रोल, डीजल अवैध्य ज्वलनशील पदार्थ विक्रीसाठीचा हा मार्ग एक सुकर मार्ग झाला असल्याने या मार्गावर भरदाव वाहन चालून अपघाताचे सत्र सुरु आहे. यावर संबंधित वाहतूक पोलिस ,प्रशासन अधिकारी, तथा अवैध ज्वलनशील पदार्थ विक्री पुरवठा अधिकारी यांचा कुठलाच अंकूश राहला नसल्याने या रोडवर अपघाताचे प्रमाण वाढल्याचे नागरिकांच्या बोलण्यातून येत आहे.
00000000000000000000