सामाजिक

जागतिक पितृ दिनाच्या पर्वावर … प्रातिनिधिक काव्यसंग्रह ” बाप ” काव्य स्पर्धेचे आयोजन

Spread the love

बापासाठी संवेदना व्यक्त करणाऱ्या भावनाचा कविता संग्रह आणि काव्य स्पर्धे चे आयोजन …

मूर्तिजापूर /  शहर प्रतिनिधी

अंकुर साहित्य संघ शाखा मुर्तिजापूर आणि संत गाडगेबाबा कर्मभूमी सेवा प्रतिष्ठान , मुर्तिजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पितृ दिनाचे औचित्य साधून ” बाप ” प्रातिनिधिक काव्यसंग्रह आणि काव्य स्पर्धे चे आयोजन करण्यात आले आहे .

1996 पासून अविरत प्रभावी साहित्य चळवळ राबविणाऱ्या अकुर साहित्य संघाचे वतीने नवकाव्यलेखनात वाचक , युवक – युवती , विद्यार्थी , विद्यार्थ्यींना लिहतं करण्यासाठी तसेच लिहिणाऱ्या नवोदितांना व्यासपीठ आणि वाव मिलावा या करीता झटत असलेल्या आणि 2016 ला स्थापना झालेल्या संत गाडगेबाबा कर्मभूमी सेवा प्रतिष्ठान मुर्तिजापूर ही संस्था संत गाडगेबाबा यांच्या विचारांना जनसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी तसेच त्यांच्या संदेशांचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी कार्य करत असून सदर काव्य स्पर्धा ही आपापल्या वडीलांचे प्रतिच्या संवेदना व्यक्त व्हाव्यात तसेच प्रत्येकांकडून पितृसेवा घडावी या उदात्त हेतूने ” बाप ” या प्रातिनिधिक काव्यसंग्रह चे माणस अंकुर साहित्य संघाचे तालुका अध्यक्ष अनिल यांनी व्यक्त केले .

स्पर्धेत सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र आणि प्रथम द्वितीय तृतीय असे आणि तिन उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात येणार आहे.

सदर काव्यसंग्रह आणि स्पर्धैत सहभाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी 7875283555 या वेटस अप नंबर किंवा मुनलाईट फोटो स्टुडिओ , मुर्तिजापूर हायस्कूल मुर्तिजापूर च्या समोरील कॉम्प्लेक्स पहिला माळा , कोकणवाडी रोड , मुर्तिजापूर या पत्त्यावर पोष्टाने दि. 11 जुलै 24 प्रयत्न पाठवावेत

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close