भारतीय सैन्याविरोधात आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या तरुणाला अटक

केरळ राज्यातील एटापल्ली येथील रहिवासी
तरुण पत्रकार असून फ्री लान्स पत्रकारिता करत होता
नागपूर / सचिन बिसेन
पहलगाम मध्ये पर्यटनासाठी गेलेल्या निष्पाप लोकांवर दहशतवाद्यांकडून करण्यात आलेल्या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर देशात संतापाची लाट पसरली होती. या हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल भारताने ऑपरेशन ‘ सिन्दुर ‘ राबवत पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या 9 तळावर हल्ला केला आहे.
या हल्ल्यात 100 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. यानंतर पाकिस्तानने काल रात्री भारतावर प्रतिहल्ला केला. भारतानेदेखील त्याला चोख प्रत्युत्तर दिले. यानंतर आता दोन्ही देशातील संघर्ष वाढला आहे. यादरम्यान नागपूरमध्ये एका पत्रकाराला अटक करण्यात आली आहे.
फ्री लान्स पत्रकार आणि कम्युनिस्ट विचारसरणी – पोलिसांनी केलेल्या चौकशीत असे आढळले की या तुमचे नाव रेजाज एम. शीबा सिदीक (28) असे आहे. तो केरळ च्या एर्नाकुलम मधील एडापली येथील रहिवासी आहे. त्याचे माओवाद्यांशी सबंध असल्याचे देखील समोर आले आहे. सिद्दिक ने एमेएसडब्ल्यु. केले आहे. त्याचे वडील प्राध्यापक आहेत आणि भाऊ एका खाजगी कंपनीत आहे. सिद्दीकी डाव्या विचारसरणीचे आहेत.
सिद्दिक सोशल मीडियावर आक्षेपार्ह आणि प्रक्षोभक पोस्ट करत असल्याने केरळ पोलिस आणि गुप्तचर संस्था त्याच्यावर देखरेख ठेवत असल्याचे समजते.
मैत्रिणीला भेटायला आला होता शहरात – सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार मागील काही काळापासून त्याची इशाय नामक तरुणीच्या संपर्कात आहे. सदर तरुणी शहरातील एका खाजगी कॉलेज मध्ये कायद्याचे शिक्षण घेत आहे. ती मूळची बिहार राज्यातील पाटणा येथील रहिवासी आहे. सिद्दिक ने सेंट्रल येव्हेन्यू रोड वर ऑनलाइन रूम बुक केली होती. आणि तो मागील चार दिवसांपासून तिच्या सोबत रूम मध्ये राहत होता.
का अटक केली? सिद्दिक ने इन्स्टाग्राम अकाऊंटवर पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केला. तसेच भारतीय सैन्यावर देखील आक्षेपार्ह लेखन केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी लकडगंज पोलिसांनी सिदीक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
यानंतर पोलिसांनी सिदीक याचा शोध सुरु केला. दरम्यान, ते दिल्ली येथे गेल्याचे कळाले. त्यानंतर ते दिल्लीहून नागपुरात आले. इथं मैत्रिणीला भेटण्यासाठी ते एका हॉटेलमध्ये थांबले असता पोलिसांनी त्यांना अटक केली. पोलिसांनी मैत्रिणीला ताब्यात घेतलं असून दोघांची कसून चौकशी केली जात आहे