सामाजिक

शेतकरी आणि पशुधन पाळणाऱ्यांसाठी दहशतीचा पर्याय ठरलेली दुसरी वाघीण ही जेरबंद 

Spread the love
भंडारा / प्रतिनिधी
                           शेतकऱ्याचा जीव घेणाऱ्या वाघिणीला वनविभागाने जेरबंद केले होते. पण
वैनगंगा नदी काठावर असलेल्या गावांमध्ये वाघाची दहशत कायम होती. आज तिला देखील जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे . या कारवाई ने नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. आणि वनविभागाचे आभार मानले आहे.
काल नरभक्षी  ठरलेल्या एका वाघिणीला वनविभागाने  जेरबंद   केले होते. आणखी एका वाघिणीला पिंजऱ्यात कैद करण्यात वन विभागाला यश आले आहे. आंतरजिल्ह्याच्या दाट जंगलातून भरकटून वैनगंगा नदीच्या किनाऱ्यावरील डांभेविरली, टेंभरी, गवराळा आदी गावांच्या शेत क्षेत्रात आलेल्या एका वाघिणीने मागील एक महिन्याच्या कालावधीत पाळीव जनावरांसह काही वन्य प्राण्यांचीही शिकार केली होती. यामुळे परिसरातील शेतकरी, पशुपालक आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
मात्र, दुसरी वाघीण वैनगंगा नदीच्या किनाऱ्यावरील गावांमध्ये पाळीव जनावरांची शिकार करत होती. ५ एप्रिल रोजी तिने गवराळा येथे एक शिकार केली. सततच्या शिकारीमुळे परिसरातील नागरिक, शेतकरी आणि पशुपालकांमध्ये मोठ्या प्रमाणावर भीती पसरली होती.
या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या मागणीची दखल घेत उपवन संरक्षक राहुल गवई यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक संजय मेंढे, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चन्ने आणि इतर वन कर्मचाऱ्यांच्या नेतृत्वाखाली शार्प शूटरसह पिंजरा, मचान आणि ट्रॅप कॅमेरे लावून वाघिणीस शिकारीचे आमिष देण्यात आले. नियोजितप्रमाणे वाघीण मचान परिसरात शिकारीसाठी आली असता शार्प शूटरने तिला डार्ट मारून बेशुद्ध केले. बेशुद्ध होताच तिला तात्काळ पिंजऱ्यात कैद करण्यात आले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close