शेती विषयक

टरबूज,खरबूज उत्पादकांना नुकसान भरपाई मागणी

Spread the love

 

विशिष्ट व्हायरसच्या प्रकोपाचा फटका

योगेश मेहरे
अकोट

अकोट तालुक्यात व तेल्हारा तालुक्यात यंदा टरबूज,खरबूज पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने तातडीची मदत जाहीर करावी, अशी मागणी तेल्हारा तालुक्यातील शेतकरी केली आहे. याबाबत शुक्रवारी दि.21 मार्च रोजी शेतकरी सुभाष रौंदळे दानापूर, सचिन कोरडे , हिंगणी, राजेश वानखडे हिवरखेड, त्यांच्यासह आधी शेतकऱ्यांनी पुढाकार घेत तहसीलदार निवेदन दिले. निवेदन म्हटले आहे.की तालुक्यात शेतकऱ्यांनी या वर्षात टरबूज, खरबूज पिकांची मोठ्या क्षेत्रात पेरणी केली होती. परंतु या पिकांचे 100 टक्के नुकसान झाले. यामुळे शेतकरी आर्थिक व मानसिकदृष्ट्या हवालद्दीन झाला आहे. ही बाब गंभीर असल्याने तहसीलदार व तालुका कृषी अधिकाऱ्यांनी कातडीने पंचनामे करण्याचे व पीक उत्पादकांना सरसकट मदत जाहीर करावी, अशी मागणी केली आहे. याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषिमंत्री,खासदार,आमदार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना निवेदन पाठवले आहे.

तेल्हारा तालुक्यात बागायतदार शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात टरबूज खरबुजाची लागवड केली होती. मात्र,वातावरण बदलामुळे या पिकांना मोठ्या प्रमाणात रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाण नुकसान झाले. शेतकऱ्यांना एक रुपयाचेही उत्पन्न झाले नाही.

सुभाष रौंदळे
मा.उपाध्यक्ष जि. प.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close