शहीद दिनानिमित्त अकोट निमा संघटनेतर्फे दिनांक 23 मार्च रोजी रक्तदान शिबिर
शिबिर दिनांक 23 मार्च 2025 रोजी*
योगेश मेहरे
अकोट
वीर भगतसिंग ,सुखदेव आणि राजगुरू यांच्या शहीद दिनानिमित्त देशव्यापी रक्तदान शिबिराचे मध्ये नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन अकोट, द्वारा अकोट येथील, रिलायन्स पेट्रोल पंपा जवळ डॉक्टर श्रीकांत कुलट यांच्या कुलट हॉस्पिटलमध्ये आयोजित केले आहे. शिबिर सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत घेण्याचे आहे,
आकोट वासियांना निमा संघटनेतर्फे
आव्हान केले जात आहे की या जगात सर्व काही फॅक्टरीमध्ये बनवल्या जाते परंतु मनुष्याचे रक्त बनविता येत नाही. आपल्या देशात सध्या रक्ताचा तुटवडा आहे.
त्यामुळे या रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी
व जनमानसात रक्तदानाविषयी जनजागृती व्हावी
व लोकांना रक्तदानासाठी प्रेरित करण्याच्या उद्देशाने
मंगळवार 23 मार्च 2025 रोजी संपूर्ण देशभरात या शिबिराचे आयोजन केले असून शहीद दिनानिमित्त
एकच दिवसात एक लाख रक्ताच्या पिशव्या संकलन करण्याचा संकल्प संपूर्ण निमा संघटना यांनी केला आहे.
आणि याच मानवतावादी कार्याचे नाव आहे संवेदना 2
म्हणून सर्व आकोटकर यांनी रक्तदान करून आपले मोलाचे योगदान द्यावे ही विनंती. राष्ट्रीय स्तरावर नॅशनल इंटिग्रेटेड फोरम ऑफ आरटीस्ट अँड ऍक्टिविस्ट ( निफा) , नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन(निमा) सर्व संस्थांचा सहभाग या कार्यक्रमांमध्ये असणार आहे.
याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये होणार आहे
म्हणून जास्तीत जास्त लोकांनी यामध्ये सहभाग घ्यावा.प्रत्येक सहभागी व्यक्तीला एक प्रमाणपत्र देण्यात येईल.
अशी माहिती निमा संघटना चे सचिव डॉ सतीश म्हैसने, उपाध्यक्ष डॉ धर्मपाल चिंचोलकर,अध्यक्ष डॉ संदिप ढोके यांनी दिली आहे.
स्थळ -कुलट हॉस्पिटल,
रिलायन्स पेट्रोल पंपाच्या मागे, श्री शिवाजी विद्यालया जवळ, अंजनगाव रोड अकोट.
वेळ सकाळी 9 ते 2 पर्यंत