विशेष

शहरातील सायकल स्टोअर्स मधून पोलिसांनी जप्त केले १.१५ कोटी 

Spread the love

अकोला / विशेष प्रतिनिधी 

                            पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे खदान पोलिसांनी शहरातील इन्कम टॅक्स चौक येथील  न्यु शर्मा ब्रदर्स सायकल व फिटनेस सामान विक्रीच्या दुकानातून १.१५ कोटी रुपये पोलिसांनी जप्त केले. ज्या व्यक्तीच्या जवळून ही रक्कम जप्त करण्यात आली तो त्याबद्दल समाधाकारक उत्तर न देऊं शकल्याने पोलिसांनी याबाबत आयकर विभागाला कळविले आहे.

मिळालेल्या माहिती नुसार पोलिसांनी याठिकाणी छापा टाकला असता कॉउंटर जवळ दिपक दिनकर घुगे (३०) रा. ग्राम खीर्डा ता. मालेगाव जि. वाशिम याच्याजवळ दोन पांढ-या रंगाच्या कापडी थैल्यामध्ये ५०० रुपयांच्या नोटा असलेले एकूण १ कोटी १५ लाख रूपये मिळुन आले. रकमेच्या मालकी हक्काचे दस्तऐवजाबाबत विचारपूस केली असता त्याने सदर रकमेच्या बाबत कोणताही मालकी हक्क वा दस्तऐवज हजर केले नाही.

शिवाय उडवाउडवीचे व असमाधानकारक उत्तरे दिल्याने पोलिसांनी सदर रक्कम पंचासमक्ष जप्त करीत मुख्य आयुक्त, आयकर विभाग नागपुर जि. नागपुर यांना याबाबतची माहिती दिली. ही कारवाई पोलिस अधीक्षक बच्चन सिंह, अप्पर पोलीस अधिक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी (शहर विभाग) सतिष कुळकर्णी, अकोला यांचे मार्गदर्शनाखाली पो. नि. मनोज केदारे व सहा. पोउपनि दिनकर धुरंधर, पोहवा निलेश खंडारे, पोकॉ विक्रांत अंभोरे व पो. कॉ. रवि काटकर पो.स्टे. खदान अकोला यांनी केली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close