अपघात

इलेक्ट्रिक शॉट लागल्याने पाचव्या मजल्यावरून पडून मजुराचा मृत्यू

Spread the love

दर्यापूरच्या बनोसा भागातील घटना

दर्यापूर (किरण होले)

दर्यापूर शहरातील बनोसा भागातील एका दुकानाचे बांधकाम सुरू असताना तब्बल पाचव्या मजल्यावर इलेक्ट्रिक मशीनमध्ये अचानक लागलेल्या शॉट ने एका मजुराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवार रोजी चार वाजताच्या सुमारास घडली आहे.
दर्यापूर तालुक्यातील लोतवाडा येथील रहिवासी गजानन वासुदेव सोळंके हे बांधकामावर मजूर म्हणून काम करत आहेत. शहरातील बनोसा भागातील कानडे यांच्या भांड्याच्या दुकानाचे पाचव्या मजल्याचे बांधकाम सुरू होते. दरम्यान अचानक सिमेंट मटेरियल मशीन मध्ये शॉट आल्याने तीन मजुरांना शॉट लागला यात दोन मजूर आत मध्ये फेकल्या गेले तर गजानन सोळंके हे पाचव्या मजल्यावर थेट जमिनीवर पडले यात गजानन सोळंके हे गंभीर जखमी झाले सदर जखमी गजानन सोळंके यांना उपजिल्हा रुग्णालयात उपचार करता दाखल केले मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने अमरावती येथे पुढील उपचाराकरिता शासकीय रुग्णवाहिकेमध्ये रेफर करण्यात आले. मात्र दर्यापूर पासून काही अंतरावर जाताच गजानन सोळंके यांनी अखेरचा श्वास सोडला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून मृतकाच्या नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली.आपल्या पोटचा गोळा गेल्याने आई ने रुग्णालयात आरडाओरडा केला . या घटने संदर्भात पुढील तपास दर्यापूर पोलीस करीत आहे .

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close