गुरु पौर्णिमेनिमित्त श्री सिदाजी महाराज मंदिर सभागृह येथे ज्येष्ठ नागरिक जेष्ठ कलावंतांचा सत्कार
पातुर तालुका प्रतिनिधी देवानंद गहिले
पातूर चे आराध्य दैवत असलेल्या संत श्री सिदाजी महाराज संस्थांनचे सभागृहामध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते
सर्वप्रथम अभिषेक आरती आणि महायज्ञ संपन्न झाला
त्यानंतर जेष्ठ कलावंतांचा सत्कार
श्री सिदाजी महाराज संस्थान आणि यात्रा पंच मंडळाचे वतीने करण्यात आला आहे
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सिदाजी महाराज यात्रा पंच मंडळाचेअध्यक्ष महादेवराव गणेशे होते तर मंचावर पांडुरंग बगाडे, नारायणराव फुलारी, दादाराव राखोंडे, देविदास नीलखन, वासुदेवराव सौंदळे, बंडू पाटील, रुस्तम गवई, तोताराम पाटील, देवानंद भाऊ गहिले, नामदेवराव राखोंडे, लक्ष्मणराव बारतासे, शामराव गिर्हे, रमेश काळपांडे, मोहन पाटील, सुरेश पाटील, प्रवीण नीलखन, राजू उगले, गणेश गाडगे, गजानन महाराज राजुरकर आदी कलावंत आणि ज्येष्ठ नागरिक मंचावर उपस्थित होते
या कार्यक्रमात बालकलावंत
ह. भ. प. खुषी भवाने, शुभम वडतकर,जय देवकर, स्वरा गाडगे, श्रेया निलखन, चैताली वडतकर, जानवी श्रीनाथ, चेतन भवाने, अभीर ढोणे, अवनी धरमठोक, गोपाल गिरोलकर, प्राची गाडगे, आकाश गाडगे , कु. रामेश्वरी फुलारी, काजल श्रीनाथ यांचा तसेच गणेश सावकार, प्रमोद हाडके, रत्नाबाई राऊत, रंजना गाडगे, यांचा सत्कार करण्यात आला
सदर सत्कार शाल श्रीफळ शेला टोपी आणि भगवतगीता रेणुकादेवी आरती संग्रह ,भजन संग्रह, सीदाजी महाराज स्तोत्र असे पुस्तक देऊन करण्यात आला आहे
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक
श्री सुधाकरराव उगले यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. वसंत गाडगे आणि आभार प्रदर्शन विनोद महाराज वडतकर यांनी केले
यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिगांबर फुलारी, विलास वळकुटे, दिगंबर
वडतकर, किशोर राखोंडे, सुहास देवकर, काशीराम गाडगे, संतोष खंडारे, राजेश भवाने,भावेश गिरोलकर, गणेश वडतकार, यांच्यासह श्री सीदाजी महाराज संस्थान आणि यात्रा पंच मंडळाचे कार्यकर्त्यांनी प्रयत्न केलेत
यावेळी महाप्रसाद घेऊन या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला