गायीने पूर्व संकेत दिल्याने आम्ही बचावलो – डॉ. विनोद एन
वायनाड / नवप्रहार डेस्क
मुसळधार पाऊस आणि भूस्खलन यामुळे केरळ मध्ये अनेक लोकांना जीव गमावावा लागला आहे. पण एका आयुर्वेदिक डॉक्टर ने दिलेल्या माहिती नुसार त्यांच्या गायीने त्यांना या आपत्तीचे पूर्व संकेत दिल्याने ते त्यांची आई आणि मोहल्ल्यातील काही लोक वाचू शकले.
मूळचे कर्नाटक येथील रहिवासी असलेले आणि आयुर्वेदिक प्रॅक्टिस करणारे डॉ.विनोद येणं यांनी आपला अनुभव कथन केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार ते जे सांगत आहेत यावर आज कुणाचाही विश्वास बसणार नाही, विनोद एन नावाच्या आयुर्वेदिक थेरपिस्टने त्यांना आलेला थरारक अनुभव सांगितला आहे. विनोद वायनाडमध्ये झालेल्या भुस्कलनामध्ये थोडक्यात बचावले आहेत.
त्या रात्री असं काही झालं ज्यामुळे मी सतर्क झाल्याचं विनोद यांनी सांगितलं. ‘आम्ही सगळे झोपलो होतो, रात्रीचा एक वाजला होता. अचानक आमची गाय हंबरडा फोडून रडायला लागली. आज मी जिवंत आहे ते आमच्या गायीमुळे, नाहीतर माझादेखील मृत्यू झाला असता’, असं डॉक्टर विनोद म्हणाले आहेत.
कर्नाटकच्या चामराजनगर जिल्ह्यात राहणारे 29 वर्षांचे विनोद आणि त्यांची आई हे वायनाडच्या भुस्कलनामध्ये वाचलेल्या ठराविक लोकांपैकी आहेत. ‘खूप पाऊस पडत होता, आम्ही नेहमीप्रमाणे झोपलो होतो. तेव्हा अचानक आमची गाय रडायला लागली. ओरडायला लागली. हे पाहून आम्हाला काहीतरी वेगळं वाटलं, त्यामुळे माझी आई गौरम्मा आणि मी गायीला बघायला शेडमध्ये गेलो, तेव्हा गाव बुडत असल्याचं आम्हाला दिसलं. मी आमच्या तीन नातेवाईक आणि गल्लीतल्या 10 जणांना उठवलं. आम्ही हॉस्पिटलच्या दिशेने पळालो. हॉस्पिटलमध्येही पाणी भरलं होतं. यानंतर आम्ही डोंगराच्या दिशेने गेलो, दुसरीकडून भुस्कलन होताना आम्ही स्वत:च्या डोळ्याने पाहिलं’, असं डॉक्टर म्हणाले.
‘आम्ही जगण्याची आशा सोडून दिली होती, तरीही डोंगरावर 2-3 किलोमिटर धावलो. आजूबाजूला भुस्कलन होत होतं. मी जिवंत आहे, यावर माझा विश्वास नाही. नंतर मला गायीची आठवण झाली, मला पुन्हा घरी जायची इच्छा झाली, पण तेव्हा माोझं घर, गाय आणि बाकीचं सगळं वाहून गेलं होतं’, अशी भावुक प्रतिक्रिया डॉक्टर विनोद यांनी दिली.
आम्हाला 10 तासांनंतर मदत पोहोचली, माझी पत्नी मेप्पाडी तिकडून 5-6 किमी लांब होती. विनोद या दुर्घटनेनंतर गावात जाऊन लोकांची मदत करत आहेत. अशा परिस्थितीमध्ये मी गाव सोडू शकत नाही. चूरलमाला गाव आता अस्तित्वात नाही. 16 वर्षांची मुलगी गायब आहे, संपूर्ण गाव दु:खात आहे, मी जे काही करू शकतो ते करणार आहे, असं डॉक्टर विनोद म्हणाले.
प्राण्यांना नैसर्गिक आपत्तीचे मिळतात पूर्व संकेत – मुक्या प्राण्यांना आणि पशू पक्षिंना नैसर्गिक आपत्तीचे पूर्व संकेत मिळतात असे म्हटल्या जाते. भूकंप आणि इतर गोष्टीचे संकेत मिळताच पक्षी आपल्या घरट्यातून बाहेर पडतात. तर खुट्याला बांधलेले प्राणी दोरी तोडण्याचा किंवा खुंटा उपटून पळून जाण्याचा प्रयत्न करतात.