क्राइम

पत्नीचे अनैतिक संबंध पतीचा राग अनावर ; डोके भुंतुवर आपटले अन विषय खल्लास 

Spread the love

नागपूर / नवप्रहार ब्युरो 

                   त्याने तिला प्रियकरा सोबतचे अनैतिक संबंध तोडायला लाख वेळा समजावून सांगितले. पण ती काही एकायला तयार नव्हती. घटनेच्या दिवशी तो मुलीला शाळेत सोडून आला त्यावेळी पत्नी पुन्हा त्याला मोबाईल वर प्रियकाराशी बोलतांना आढळली. यामुळे दोघात वाद झाला. त्याने तिचे डोके भिंतीवर आपटले. आणि पत्नी खल्लास. याबाबत मुलीने दिलेल्या माहितीवरून या प्रकरणाचा खुलासा झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, सूरज आणि राखी ऊर्फ पुनम यांच्यात प्रेमसंबंध असल्याने त्यांनी ९ वर्षांपूर्वी लग्न केले. त्यांना दोन आणि पाच वर्षाच्या दोन मुली आहेत. गेल्यावर्षी राखीचे एका मुलाशी प्रेमसंबंध जुळले. ही बाब तिच्या पतीला माहिती झाली.

तेव्हापासून दोघांमध्ये सातत्याने भांडणे व्हायची. त्यामुळे राखी दोनदा घरातून पळून गेली होती. त्याबाबत सूरजने हुडकेश्‍वर पोलिस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तिचा शोध घेऊन तिला सूरजच्या स्वाधीन केले होते.

गुरुवारी दुपारी सूरज मोठ्या मुलीला शाळेतून घेऊन घरी आला. यावेळी राखी फोनवर प्रियकराशी बोलताना सूरजला आढळून आली. त्यामुळ त्याचा राग अनावर झाला. दोघांचेही कडाक्याचे भांडण झाले. त्यात राखीचे डोके सूरजने भिंतीवर आदळल्याने तिचा मृत्यू झाला.

घटनेनंतर त्याने पत्नीला मेडिकल रुग्णालयात उपचारासाठी नेले. तिथे ती पहिल्या माळ्यावरून पडल्याची माहिती दिली. डॉक्टरांनी पोलिसांना सूचना दिल्यावर पोलिसांनी मेडिकलमध्ये दाखल होऊन चौकशी केली. सूरजच्या मोठ्या मुलीला विचारणा केल्यावर तिने याबाबत माहिती दिली. त्यातून खुनाचा उलगडा झाला. पोलिसांनी सूरजला अटक केली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close