सामाजिक

भूसंपादनासह पुनर्वसन प्रक्रिया तातडीने राबवा निम्न पैनगंगा प्रकल्प समर्थकांची जिल्हा कचेरीवर धडक

Spread the love

 

यवतमाळ प्रतिनिधी : निम्न पैनगंगा प्रकल्पाचे भूसंपादन व पुनर्वसन प्रक्रिया तातडीने राबविण्यात यावी, तसेच धरणाचे रखडलेले कामे पुर्ण करण्यात यावी, अशी मागणी निम्न पैनगंगा प्रकल्प समर्थकांनी केली आहे. याच पार्श्वभुमीवर प्रकल्प समर्थकांनी मंगळवार, ७ जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. तसेच प्रलंबित मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.
निम्न पैनगंगा प्रकल्प हा पैनगंगा नदीवरील राज्यातील मोठे प्रकल्प आहे. विदर्भातील यवतमाळ व चंद्रपुर जिल्ह्यासाठी एक महत्वाचा व फायद्याचा सिंचन प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे यवतमाळ, नांदेड व चंद्रपूर जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त, मागासवर्गीय व नक्षलग्रस्त भागास सिंचनाचा लाभ मिळणार आहे. शिवाय या भागातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटून, औद्योगिकरण, मत्स्यव्यवसाय, पर्यटन, दळणवळण, कृषी उत्पन्न वाढ होऊन या भागाचा विकास होणार आहे. या प्रकल्याच्या प्राथमिक कामास अंदाजे २५ वर्षापासुन सुरुवात झाली. परंतु आतापर्यंत प्रकल्पाचे काम पूर्ण झाले नाही. असे असतांनाच प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील गावांमध्ये कलम (११) लागु झाल्यामुळे मागील एक ते दोन वर्षांपासून येथील शेतजमीनीच्या खरेदी विक्री व्यवहारावर शासनाने निर्बंध लावले. यामुळे शेतकºयांना शेत जमीन विकता येत नाही किंवा त्या जमीनीवर कर्ज घेता नाही. तसेच कुठल्याही शेतीपुरक उद्योग देखील उभारता येत नाही. यामुळे शेतकºयांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यात प्रामुख्याने शेतकºयांना ७/१२ मध्ये बदल न करता येणे, प्रकल्प बाधित शेतजमीन व घरांचे खरेदी विक्रीस बंदी आहे. यामुळे रेडिरेकनर दरांमध्ये सुधारणा करण्यात आली नाही. तसेच बाजार मुल्य सुद्धा वधारले नाही, तसेच गावे पुनर्वसन होत असल्यामुळे गावांमध्ये कोणतेही सुख सुविधेचे काम होत नाही. गावातील विकास कामे पूर्णत: बंद आहे. जलसंपदा विभागाने २००७ ते २०१४ दरम्यान खरेदी केलेल्या जमिनीचा वाढीव मोबदला देण्याचे मान्य केले होते. मात्र आता प्रकल्पाची कामे बंद असल्याने वाढीव मोबदला मिळण्यास अडचणी येत आहे. यामुळे प्रकल्पासाठी जमीनीच्या भूसंपादन व पुनर्वसनाची कामे त्वरीत सुरू करण्यात यावी. अशी मागणी निम्न पैनगंगा प्रकल्प समर्थकांनी केली आहे. यावेळी शैलेश डफळे, संजय देवतळे, महेंद्र डफळे, भिमराव आडे, मनोज मरसकोल्हे, राहुल खरतडे, दीपक वानखडे, नारायण गिनगुले, बाळकृष्ण मरापे, निकेश गिनगुले, संजय राऊत, नरेंद्र जनार्दनराव डफळे, रोहित विलास कनाके, नितिन डफळे, दशरथ राऊत यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close