सामाजिक

ज्या शाळेने मला घडविले त्या शाळेचे व गावाचे ऋण कधी विसरणार नाही -महान सुपुत्र अग्नीविर ऋषिकेश टेकाम

Spread the love

येनस येथिल पुर्व माध्यमिक जिल्हा परिषद शाळा घडवीतोय उत्तम विद्यार्थी

ग्रामीण भागातूनच दर्जेदार शिक्षण विद्यार्थ्यांचा शिक्षणावर विशेष भर

नांदगाव खंडेश्वर ता.प्र

पवन ठाकरे

नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पुर्व माध्यमिक जिल्हा परिषद शाळा येनस येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, यावेळी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी येनस शाळेतील घडविलेला विद्यार्थी महान सुपुत्र ऋषिकेश शंकर टेकाम.हा जिल्हा परिषद शाळेतूनच अग्नीवीरमध्ये दाखल झालेला आहे भारताच्या स्वातंत्र्य अमृत महोत्स वर्षात जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा येणस येथे विविध प्रेरणादायी आणि स्मूर्तीदायी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी मनी जिद्द निर्माण व्हावी याकरिता आई वडील महान सुपुत्र ऋषिकेश यांचा सत्कार घेण्यात आला  असून ध्वजारोहन सुद्धा अग्नीवीर म्हणून त्यांच्या हस्ते करण्यात आला होता.

जिल्हा परिषद शाळेतील गरीब घराण्यातील शिक्षण घेणाऱा मुलगा आज देश सेवेत स्वामिल झाल्याने त्याचे सर्व ठिकाणावरुण कौतुक होत आहे.. आज अनेक पालक मुलांचा शिक्षणाकरिता मुलांना काॅन्वेहट मध्ये पाठवतात.पण आज ह्या मुलाने जिल्हा परिषद शाळेत शिकून एस प्राप्त केले हे येनस येथिल जिल्हा परिषद शाळे करिता अभिमानास्पद गोष्ट आहे असे शाळेचे

प्रशांत खरबडे (मुख्याध्यापक}.

 

 मी कशाप्रकारे आपले अगनीवीर मध्ये सामील झाल्याचे मार्गदर्शन करताना सांगितले काॅन्वेट मध्येच शिक्षण घ्यावे लागते हे चुकीचे आहे जिद्द व कष्ट करण्याची तयारी असेल तर यश हमखास मिळते माझे शिक्षण येनस येथील जिल्हा परिषद शाळेतच झाले आपणही शिकून मोठे व्हावे येनस येथिल जिल्हा परिषद शाळेचे ऋण मी कधी विसरणार नाही .

ऋषिकेश टेकाम , अग्निविर

 

येनस शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत खरबडे. शिक्षकांनी शिक्षण क्रीडा क्षेत्रात आपले विद्यार्थी चमकावेत म्हणून विशेष प्रयत्न सुरू केले असुन विद्यार्थ्यांच्या गुणांना वाव देण्यासाठी
प्रोत्साहन दिले जात आहे शाळेत वेगवेगळे शिक्षण खेळ शिकवल्या जात असून खाजगी शाळांच्या तोडीसतोड गुणवता या शाळेत निर्माण केली जात आहे परिणामी ग्रामीण भागातील शाळा बंद पडण्याच्या मार्गावर असताना ही शाळा मात्र पालक व विद्यार्थीप्रिय ठरली असून बाहेरील मुलं येथे शिक्षण घेण्यासाठी येत आहे

शंकर लेंडे

शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शंकर लेंडे

 

शिक्षक मनोहर चव्हाण. परमानंद वैष्णव. प्रतिभा राऊत. गावातील प्रतिष्ठित नागरिक बबनराव फुके. हरिदास देशमुख. दिवाकर कणसे. पोलीस पाटील हनुमंत सोनोने. पोलीस पाटील योगेश फुके. प्रदीप रघुते. सुदाम जी कणसे. सरपंच रंजना चौधरी. नितीन माहल्ले. उपसरपंच किष्णा वासनिक. व तसेच ग्रामपंचायत कर्मचारी सदस्य व गावातील नागरीक स्वातंत्र्यदिनी पुर्व माध्यमिक जिल्हा परिषद शाळेत मोठ्या संख्येने उपस्थित होते

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close