क्राइम

प्रेमाची शिक्षा सर्वांसमोर ठेवायला लावले शारीरिक संबंध आणि पाजली लघवी

Spread the love
 
झाडाला बांधून रात्रभर केली मारहाण 
 
गुजरात / विशेष प्रतिनिधी 
                  जग चंद्रावर जाण्याच्या तयारीत असताना काही ठिकाणी ज्या घटना घडत असतात त्यावरून हे लोक अद्यापही 18 व्या शतकात जगत असल्याचे वाटते. एकीकडे जनतेच्या न्यायासाठी कायदे मजबूत करून सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा सरकारचा प्रयत्न असतो.तर दुसरीकडे आजही काही भागात आजही पंचायत जे ठरवेल ते मान्य करण्याची सक्ती असते. पंचायत कडून मानव जातीला लाजिरवाणे करण्याचा प्रकार गुजरात मधील सुरेंद्रनगर जिह्यात घडला आहे.

या जिल्ह्यातून माणुसकीला काळिमा फासणारी आणि अंगावर काटा आणणारी अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. आपल्या पतीला सोडून दुसऱ्या पुरुषासोबत राहण्यास गेलेल्या एका विवाहितेला पकडून आणत, तिच्यावर ‘शुद्धीकरणा’च्या नावाखाली अमानुष आणि विकृत अत्याचार करण्यात आले.

पीडित महिलेला झाडाला बांधून मारहाण करण्यात आली आणि ज्या पुरुषासोबत ती गेली होती, त्याच्यावरच सर्वांसमोर तिच्याशी लैंगिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती करण्यात आली. एवढ्यावरच न थांबता याचा व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन महिलांसह एकूण ९ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

घरातून पळून गेली अन् पतीने शोधून आणले पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित महिला आपल्या पतीला सोडून दुसऱ्या एका पुरुषासोबत राहण्यासाठी निघून गेली होती. यानंतर पतीने आणि त्याच्या कुटुंबीयांनी तिला शोधून आणले व घरात डांबून ठेवले होते. मात्र, संधी मिळताच ती महिला पुन्हा घरातून निसटली आणि त्याच पुरुषाकडे गेली. संतापलेल्या पतीने आणि गावातील काही लोकांनी दोघांचा कसून शोध घेतला आणि अखेर दोघांनाही पकडून सुरेंद्रनगर येथे परत आणले.

झाडाला बांधले, व्हिडिओ काढला अन् व्हायरल केला सुरेंद्रनगरमध्ये आणल्यानंतर या दोघांसोबत जे घडले, त्याने संपूर्ण देश हादरला आहे. तथाकथित शुद्धीकरणाच्या आणि संस्कारांच्या नावाखाली पीडित महिलेला भरचौकात झाडाला बांधण्यात आले आणि तिला बेदम मारहाण करण्यात आली. जमावाने विकृतीचा कळस गाठत, ज्या पुरुषासोबत ती गेली होती, त्यालाच सर्वांसमोर त्या महिलेवर अत्याचार करण्यास आणि लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. महिला मदतीसाठी याचना करत असताना आरोपी या संपूर्ण घृणास्पद कृत्याचा मोबाईलवर व्हिडिओ शूट करत होते. नंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला.
 

दोन महिलांसह ९ आरोपींना अटक हा किळसवाणा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली. सुरेंद्रनगरचे पोलीस अधीक्षक प्रेमसुख डेलू यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ तपासाचे आदेश दिले. पोलिसांनी तातडीने हालचाली करत पीडित महिलेचा शोध घेतला, तिला वैद्यकीय मदत पुरवली आणि तिची सविस्तर साक्ष नोंदवली. व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी आरोपींची ओळख पटवून पतीसह दोन महिला आणि इतर पुरुषांसह एकूण ९ आरोपींना अटक केली आहे.पोलीस या प्रकरणी पुढील कठोर कायदेशीर कारवाई करत आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close