क्राइम

भूतबाधा उतरवण्याच्या नावावर 14 वर्षीय मुलीवर भोंदूबाबा कडून लैंगिक अत्याचार 

Spread the love
 
गुन्हा दाखल झाल्यावर पीडित कुटुंबाला धमकावण्याचा प्रकार उघड 

फलटण /विशेष प्रतिनिधी

                           सध्या जिकडे तिकडे भोंदूबाबा चे पेव फुटले आहे. या वैज्ञानिक युगात देखील लोकं अश्या लोकांच्या बोलण्यात अडकून कुटुंबातील महिला वर्गाचे आयुष्य उध्वस्त करत आहेत. तज्ञ डॉक्टरांकडून योग्य उपचार करवून न घेता कुठल्यातरी व्यक्तीच्या सांगण्यावरून कुटुंबातील लोक घरातील महिला किंवा तरुणीला अशा बाबांकडे घेऊन जातात.आणि हे भोंदूबाबा महिला तरुणींचे लैंगिक शोषण करतात. काही वेळा महिला / तरुणी याबद्दल कुटुंबाला सांगतात आणि असा घृणास्पद प्रकार उघड होतो.पण अनेक वेळा महिला / तरुणी लाजेखातर घरच्या लोकांच्या कानावर असला प्रकार घालत नाहीत.त्यामुळे भोंदूबाबाचे डेरिंग वाढते आणि त्यांचा हा प्रकार बिनबोभाट सुरू असतो.

 भूतबाधा झाल्याचे सांगून ती काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याच्या गंभीर प्रकरणात फलटण येथे घडला आहे. कुटुंबांनी  शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे .त्यावरून   संबंधितावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या भोंदूबाबा आणि त्याच्या चेल्या चपाट्याने पीडित कुटुंबाला धमकावणे सुरू केले आहे.

पीडित कुटुंबाच्या घराबाहेर कथित भोंदू गुरु-चेल्यांकडून धमकीवजा चिठ्ठी लिहून ठेवण्यात आली असून, ‘अमावस्येपर्यंत तक्रार मागे घेतली नाही तर घरदार संपवू’, असा मजकूर त्यात असल्याचे सांगण्यात आले आहे. चिठ्ठीजवळ लिंबू, हळद-कुंकू आणि टाचण्या आदी वस्तू ठेवण्यात आल्याने कुटुंबात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणातील तक्रारीनुसार, चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीला भूतबाधा झाल्याचे भासवून तिच्यावर उपचार करण्याच्या बहाण्याने संशयित सौरभ नाना मदने याने तिच्या कुटुंबीयांचा विश्वास संपादन केला. भूत उतरविण्याच्या नावाखाली मुलीला विविध ठिकाणी नेण्यात आले. त्यानंतर एका पडक्या घरात नेऊन तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला. विशेषतः अल्पवयीन मुलांच्या बाबतीत अशा व्यक्तींवर आंधळा विश्वास न ठेवता पालकांनी तातडीने डॉक्टर, मानसोपचार तज्ज्ञ किंवा संबंधित शासकीय यंत्रणांची मदत घेणे गरजेचे असल्याचे पोलिस सांगत आहेत. अत्याचाराच्या तक्रारीनंतर पीडित कुटुंबाला धमकावण्यासाठी चिठ्ठी लिहिणे आणि घराबाहेर संशयास्पद वस्तू ठेवणे हा प्रकार स्वतंत्रपणे गंभीर आहे. या प्रकारामागे नेमके कोण आहेत, चिठ्ठी कोणी लिहिली आणि पीडित कुटुंबावर दबाव आणण्याचा प्रयत्न कोणी केला, यांची चौकशी पोलिसांकडून सुरू आहे.पडक्या घरात संशयास्पद वस्तू संबंधित पडक्या घरात हळद-कुंकू, गुलाल, बिस्कीट, वेफर्स आदी वस्तू आढळल्याचेही समोर आले आहे. या वस्तूंचा वापर नेमका कशासाठी केला जात होता, याबाबत पोलिस तपास करत आहेत.अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलींच्या सुरक्षिततेशी खेळ या घटनेमुळे अंधश्रद्धेच्या नावाखाली तथाकथित भोंदू व्यक्तींवर विश्वास ठेवण्याचे गंभीर परिणाम पुन्हा एकदा समोर आले आहेत. मुलाला किंवा मुलीला भूतबाधा, करणी, बाधा झाली आहे असे सांगून उपचाराच्या नावाखाली त्यांना एकांतस्थळी नेणे, अंगारा-धुपारा करणे किंवा कोणत्याही प्रकारचा शारीरिक स्पर्श करणे, हे अत्यंत धोकादायक ठरू शकते.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close