अवैध रित्या जनावरे नेणाऱ्या वाहनावर वरुड पोलिसांची कारवाई
लोडिंग गाडीसह ४लाख ९५ हजाराचा मध्यमाल जप्त
वरुड / प्रतिनिधी
रविवार दिनांक 7 मे रोजी वरुड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील एसटी बस स्थानकासमोरून मोर्शी कडे अवैधरित्या गोवंश घेऊन जात असल्याची माहिती वरुड पोलिसांना मिळतात एस टी बस स्थानकासमोर पोलिसांनी नाकाबंदी केली असता एक छोटी लोडिंग गाडी क्रमांक एम पी 28 झेड बी 8794 संशयितरित्या मूलताई चौकातून एसटी बस स्थानकाकडे येताना पोलिसांना दिसली असता सदर गाडीमध्ये अवैधरित्या 4 गोवंश निर्दयीपणे कोंबून आढळून आले होते.पोलिसांनी याबाबत वाहन चालकाला या बाबत पोलिसांनी माहिती विचारली असता सदर गोवंश हिवरखेड मोर्शी येथे घेऊन जात असल्याचे कबूल केले होते.वरुड पोलिसांनी याप्रकरणा तिल आरोपी गोपाल उदयभानजी देवहरे वय 22 वर्ष राहणार कळमगाव तालुका पांढुर्णा जिल्हा छिंदवाडा मध्य प्रदेश व सुनील वसंतराव बोरवार यांच्याविरुद्ध फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल सुरेश कांबळे यांच्या तक्रारीवरून कारवाई करण्यात आली आहे .याप्रकरणी वरुड पोलिसांनी चार गोवंश सह चार लाख 95 हजाराचा मुद्द्यामाल जप्त करण्यात आले असून
जप्त करण्यात आलेले गोवंश संगोपनासाठी गोपाल कृष्ण गौरक्षण संस्था वरुड येथे ठेवण्यात आले आहे
सदरचे कारवाई पोलीस निरीक्षक प्रदीप चौवगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास वरुड पोलीस करीत आहे.