सामाजिक

जागतिक वसुंधरा दिन निमित्त पथनाट्या सादर करून जनजागृती

Spread the love

 

घाटंजी तालुका प्रतिनीधी- सचिन कर्णेवार

माहीती प्रसारण मंत्रालय महाराष्ट्र राज्य,केंद्रीय संचार ब्युरो पुणे तसेच क्षेत्रिय कार्यालय अमरावती द्वारा आयोजित वसुंधरा दिना निमित्त दिनांक २२..४.२०२३ ला यवतमाळ तालुक्यातील अकोला बाजार येथे जनजागृती कलापथक कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले.नवचैतन्य बहु विकास युवा मंडळ शिरोली ता घाटंजी जिल्हा यवतमाळ या संस्थाच्या चमुने कलापथक व्दारे वसुंधरा दिना निमित्त कलापथक व्दारे माती अडवा पाणी जिरवा, मृदा संवर्धन,वृक्ष संवर्धन, बांधबंदिस्ती,पर्यावरण,सेंद्रिय शेती काळाती गरज आदि विविध विषयांवर मनोरंजनाच्या माध्यमातून कलापथकातून गावकऱ्यांचे मार्गदर्शन केले. कलापथक कार्यक्रम च्या सुरुवातीला देवाचे नमन करून कार्यक्रम ला सुरवात करण्यात आली नंतर प्रकल्प गिते,शेतकरी गिते घेऊन गावक-यांना कार्यक्रम च्या स्थळी बोलविण्यात आले.पथनाट्याव्दारो गावातील समस्या गावकऱ्यांन समोर मांडून त्या समस्येचे निराकरण कसे करायचे हे पटवून देण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्षेत्रिय अधिकारी श्री अजीतजी गाडगे अमरावती यांचे मार्गदर्शन लाभले होते. कार्यक्रम ला ग्रामपंचायत कार्यालय चे सरपंच श्री योगेश वि.राजुरकर, उपसरपंच श्री प्रविण मोगरे, पो.पाटिल श्री प्रविण जैस्वाल व हजारो ग्रामस्त उपस्थित होते. कलापथक कार्यक्रम सादरीकरणासाठी संस्था चमचे सांस्कृतिक प्रमुख श्री प्रफुल्ल रा राऊत, सचिव राहुल जीवने, नरेश कुंटलवार, प्रशांत लोखंडे, उल्हास लोखंडे, मारोती पेंदोर, गणेश उईके, नितेश मोहुर्ले यांनी अथक परिश्रम घेतले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close