नाशिक धर्मांतरण प्रकरणातील महिला आरोपी हिदा खान जेरबंद : काय घडले कोर्टात

११ तारखेपर्यंत पोलिस कोठडी
निदा खान प्रकरणातील सरकारी वकील अजय मिसर यांनी म्हटले की, निदान खान यांचा अटकपूर्व जमीन अर्ज २ मे रोजी रद्द केला होता. त्यानंतर आरोपी फरार होती. नाशिक आणि छत्रपती संभाजी नगर पोलिसांनी एकत्रित कारवाई करत तिला अटक केली आहे. महिला असल्याने आणि सूर्यास्तानंतर अटक झाल्याने तिला न्यायालयाची परवानगी घेऊन नाशिकला आणण्यात आलं. आम्ही ७ दिवसांची पोलिस कोठडी मागितली होती, आता तिला ११ तारखेपर्यंतची कोठडी सुनावण्यात आली आहे.
नमाज, हिजाब अन् ट्रेनिंग
पुढे बोलताना वकील अजय मिसर यांनी सांगितले की, या प्रकरणातील पीडितेला धर्मांतराच्या उद्देशाने धाक दाखवण्यात आला होता. तिला बुरखा देण्यात आला, नमाज, हिजाब याबाबत ट्रेनिंग देण्यात आले. यात निदाचा काय रोल आहे? इतर कोणी सहभागी आहे का याचा तपास करायचा आहे. पीडितेच्या मोबाईलमध्ये चिथावणीकारक काही रिल टाकण्यात आले होते. याचा सखोल तपास आवश्यक आहे. पीडितेच्या घरी जाऊन आरोपीने नमाज, बुरखा याबाबत कारवाई केली आहे. त्याचा तपास करायचा आहे
नमाज, हिजाब अन् ट्रेनिंग
पुढे बोलताना वकील अजय मिसर यांनी सांगितले की, या प्रकरणातील पीडितेला धर्मांतराच्या उद्देशाने धाक दाखवण्यात आला होता. तिला बुरखा देण्यात आला, नमाज, हिजाब याबाबत ट्रेनिंग देण्यात आले. यात निदाचा काय रोल आहे? इतर कोणी सहभागी आहे का याचा तपास करायचा आहे. पीडितेच्या मोबाईलमध्ये चिथावणीकारक काही रिल टाकण्यात आले होते. याचा सखोल तपास आवश्यक आहे. पीडितेच्या घरी जाऊन आरोपीने नमाज, बुरखा याबाबत कारवाई केली आहे. त्याचा तपास करायचा आहे.




