शहरात परशुराम जन्मोत्सव उत्साहात
धामणगाव रेल्वे,
अखिल भारतीय ब्राह्मण सभेच्या सर्व शाखांच्या वतीने धामणगाव शहरात भगवान श्री परशुराम जयंती निमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले या शोभायात्रेत शेकडो महिला पुरुष व लहान मुलांच्या गगनभेदी जय परशुराम च्या घोषणेने सर्वत्र वातावरण परशुराम मय झाले होते दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी टिळक चौक श्री मारोती संस्थान येथून निघालेल्या शोभायात्रेत धामणगाव नगर तथा परिसरातील शेकडो महिला पुरुष वृद्ध व बालकांनी मोठ्या संख्येत सहभाग दर्शविला शोभायात्रेमध्ये भजन कीर्तन व जितू महाराज चौबे यांनी साकारलेल्या भगवान परशुराम तसेच श्रीराम लक्ष्मण सीता हनुमान यांची झाकी आकर्षणाच्या केंद्र ठरल्यात शहरातील प्रमुख मार्गाने सिनेमा चौक, मुख्य बाजार, ओळ गांधी चौक,माहेश्वरी भवन, अमर शहीद भगतसिंग चौक, कॉटन मार्केट ते श्री रामदेव बाबा मंदिर पर्यंत मार्ग कर्मीत केलेल्या शोभायात्रेचे शहरातील नागरिकांनी प्रचंड उत्साहाने स्वागत केले ठीक ठिकाणी पुष्पांचा वर्षाव व भगवान परशुरामाच्या फोटोचे पूजन करण्यात आले शहरात सर्वत्र रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या संस्कार फेम दिनेश शर्मा, भैया पांडे, जय पांडे व यांच्याद्वारे गायल्या गेलेल्या जय जय परशुराम व परशुरामजी की सेना चली हे भजन नगरवासियांना आकर्षित करीत होते तसेच शहरातील मुख्य चौकांमध्ये थंड पेयाची व्यवस्था अन्य समाज बंधू-भगिनींनी केली होती सर्वत्र एकतेची भावना निर्माण झाल्याचे दृश्य सुद्धा निदर्शनास आले शोभायात्रे मध्ये युवकांसह महिला भगिनींची उपस्थिती उल्लेखनीय होती श्री रामदेव बाबा मंदिर देवस्थान ट्रस्ट येथे समारोपीय कार्यक्रमात समाजाचे जेष्ठ ओमप्रकाश जोशी तथा दत्ता सराफ यांच्या हस्ते गौरव अनंत देवघरे, शुभम श्रीप्रकाश चौबे तसेच वंशिका पवन जोशी यांचा सत्कार करण्यात आला
कार्यक्रमांचे संचालन दिनेश शर्मा व आभार वैभव पोतदार यांनी मानले
दुलीचंद महाराज छांगाणी यांच्या हस्ते भगवान परशुरामांची आरती व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली