सामाजिक

बकरी ईद म्हणजेच ‘ईद उल अज्हा’ धामणगाव शहरात उत्साहात साजरी

Spread the love

*धामणगाव रेल्वे*

बकरी ईद म्हणजेच ‘ईद उल अज्हा’ मुस्लिम समाजात इस्लामी कालगणनेच्या शेवटच्या ‘जिलहिज्जा’च्या १० तारखेला त्याग व बलिदानाची शिकवण देणारा सण या सणानिमित्त धामणगाव रेल्वे शहरातील ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी मोठ्या भक्तिभावाने नमाज अदा करून सर्वांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.बकरी ईद हा मुस्लिम बांधवांचा महत्त्वाचा सण असल्याने या दिवशी बकऱ्याची कुर्बानी देण्याची प्रथा आहे. हजरत इब्राहिम अलैहीस्लाम व त्यांचे पुत्र हजरत इस्माईल अलैहीस्लाम यांच्या त्याग व बलिदानाच्या स्मृतीप्रीत्यर्थ बकरी ईद सण साजरा करण्यात येतो. आशा नूरानी मस्जिद चे इमाम हाफिज जाकिर यांनी प्रबोधन देताना सांगितला आहे .यावेळी मुस्लिम समाजातील बांधवांनी एकत्र येऊन धामणगाव शहरातील ईदगाह मैदानावर सकाळी साडेसात वाजता हाफिज इमरान यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक नमाज अदा केली. तर हाफिज इमरान यांनी मुस्लिम बांधवांसाठी धार्मिक प्रवचन दिले. नमाज अदा केल्यानंतर प्रार्थनाकरताना देशात शांतता राहावी, जातीय सलोखा अबाधित राहावा, यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली. तसेच ईद शांततेत होण्यासाठी दत्तापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गिरीश ताठोड यांच्या नेतृत्वाखाली ईदगाह मैदान व शहरातील विविध भागात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close