क्राइम

अय्यान एका तासासाठी मित्राला द्यायचा 500 रुपये 

Spread the love
परतवाडा लैंगिक शोषण प्रकरण
अमरावती /विशेष.प्रतिनिधी
            जिल्ह्यातील परतवाडा मध्ये गाजत असलेल्या तरुणी लैंगिक शोषण प्रकरणात नवनवीन खुलासे होत आहेत. अय्यान अमरावती येथील कठोरा नाका परिसरातील मित्राच्या फ्लॅट वर नेऊन तरुणींचे लैंगिक शोषण करून आक्षेपार्ह व्हिडिओ बनवत होता. आणि मित्राला तो फ्लॅट चा वापर करण्यासाठी एका तासाला 500 रु देत असल्याचा धक्कादायक प्रकार तपासात समोर आला आहे.
                    अख्ख्या राज्यात गाजत असलेल्या परतवाडा सेक्स स्कँडल प्रकरणात पोलिसांचा तपास जसजसा पुढे सरकत आहे. तसतसे नवनवीन खुलासे समोर येत आहेत. तरुणींना आणि अल्पवयीन मुलींना आपल्या प्रेम जाळ्यात अडकवून अय्यानं अहमद त्यांचे लैंगिक शोषण करीत होता.आणि या अंतरंग क्षणाचे व्हिडिओ बनवून तो त्या तरुणींना आणि अल्पवयीन मुलींना ब्लॅकमेल करत होता.
 लैंगिक शोषणासाठी मित्राच्या फ्लॅट चा वापर – मिळालेल्या माहिती नुसार अय्यान ज्या तरुणी किंवा मुलींना आपल्या जाळ्यात अडकवत होता. त्यांना घेऊन तो अमरावती येथील कठोरा नाका परिसरात असलेल्या आपल्या मित्राच्या फ्लॅट वर घेऊन यायचा.
 मित्राला एका तासासाठी द्यायचा 500 रु. – पोलिस तपासात असे आढळून आले की अय्यान अहमद मुलीला घेऊन या फ्लॅट वर यायचा .येथे तो मुलीसोबत एक तास घालवत होता. यासाठी तो आपल्या मित्राला 500 रु. देत होता.
 आता पर्यंत सहा आरोपींना अटक – या प्रकरणात पोलिसांनी अय्यान सह आणखी पाच आरोपींना अटक केली आहे. त्यामुळे आरोपींची संख्या सहा झाली आहे.
 हिंदू संघटना आक्रमक, मुस्लिम समुदायाची देखील कठोर शिक्षेची मागणी – या घटनेनंतर हिंदू संघटना आक्रमक झाल्या आहेत. अनेक संघटनांनी अय्यान यांचेवर कठोरातून कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. तर मुस्लिम संघटना देखील आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करत आहेत.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close