अपघात

बंधाऱ्यावर गेलेल्या प्रियकाराचा सेल्फी काढतांना पाय घसरला अन .

Spread the love

सांगली / नवप्रहार डेस्क

             प्रियकर आणि प्रेयसी बंधाऱ्यावर फिरायला गेले असता हे  दोघे  सेल्फी  काढण्यासाठी बंधाऱ्याच्या मधात गेले. दरम्यान कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढली. पाणी वाढत असल्याचे पाहून प्रेयसी काठावर आली. पण प्रियकर मात्र सेल्फी मध्येच गुंतून राहिला. त्यामुळे पाण्याच्या प्रवाहासोबत तो कृष्णा नदीच्या वाहून गेला. .

परंतु कृष्णेच्या पाणी पातळीमध्ये अचानक वाढ झाल्याने पाणी बंधाऱ्यावरून वाहू लागले. यावेळी प्रेयसी मात्र बंधाऱ्यावरून काठावर आली. परंतु प्रियकर त्याच ठिकाणी बंधाऱ्यावरून सेल्फी काढत होता. पाणी पातळी वाढल्याने संबंधित तरुण देखील काठावर येऊ लागला तितक्‍यात बंधाऱ्यावरून पाणी वाहू लागल्याने त्याचा पाय घसरल्याने तो कृष्णा नदीत बुडाला.

घटनास्थळी पोलीस आणि बचाव पथक दाखल झाले असून, बुडालेल्या तरुणाचा सध्या शोध सुरू आहे. सांगलीत गेल्या चार दिवसात ही दुसरी घटना आहे. मासेमारीसाठी गेलेल्या आठ वर्षाच्या मुलाचा कृष्णा नदीमध्ये बुडून मृत्यू झाला होता. आता सेल्फी काढत असताना तरुण बुडाण्याची ही दुसरी घटना घडली आहे.

What’s your Reaction?
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close