क्राइम
Related Articles
Check Also
Close
सितापूर / नवप्रहार न्यूज नेटवर्क
संतरा चे वागणे श्यामु सिंग ला खटकले त्यामुळे श्यामु सिंग ने भरचौकात आणून पुतणीची गळा चिरून हत्या केली. आणि स्वतः रक्ताने माखलेला चाकु घेऊन ठाण्यात हजर झाला. पोलिसांनी त्याला शांत करून त्याच्या हातातून चाकू काढून घेतला. त्याला आस्थेने विचारपूस केल्यावर सांगितले की संतरा त्याची पुतणी होती आणि तिने प्रेमविवाह केल्याने समाजात होणाऱ्या बदनामी पोटी त्याने तिची हत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली. खुनाच्या खळबळजनक घटनेची माहिती मिळताच एएसपी सुशील चंद्रभान यांच्यासह मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. ऑनर किलिंगचे हे प्रकरण बाजनगर येथे घडले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत संतरा गाझियाबादमध्ये राहत होती. गावातील रहिवासी रूपचंद्र मौर्य त्याच गावात रहायचा दरम्यान या दोघांचे प्रेमसंबंध तयार झाले. त्यानंतर दोघांनी पळून जाऊन लग्न केले. रूपचंद्र आधीच विवाहित आहे. गेल्या दहा दिवसांपासून रूपचंद्र आणि संतरा गावात राहू लागले होते. प्रेमविवाहामुळे संतरा यांच्या नातेवाईकांना राग आला होता.
शनिवारी दुपारी संतरा रूपचंद्र याच्या घरी असताना काका शाम सिंग यांनी रूपचंद्र यांच्या घरात घुसून पुतणी संतरा हिला घरातून ओढत चाकूने गळा चिरून निर्घृण खून केला. यामुळे खुनाच्या घटनेने गावात एकच खळबळ उडाली. खून केल्यानंतर काका श्यामू सिंग स्वतः रक्ताने माखलेल्या चाकूसह पोलीस ठाणे गाठले.
रूपसिंगच्या हातात चाकू पाहून उपस्थित पोलिसांमध्ये खळबळ उडाली. घाईगडबडीत पोलीस कर्मचाऱ्यांनी श्यामू सिंगला ताब्यात घेत त्याच्या हातातील चाकू काढून घेतला. पोलिसांनी आरोपी काकाला शस्त्रासह अटक केली आहे. या हत्याकांडानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
Cookie | Duration | Description |
---|---|---|
cookielawinfo-checkbox-analytics | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Analytics". |
cookielawinfo-checkbox-functional | 11 months | The cookie is set by GDPR cookie consent to record the user consent for the cookies in the category "Functional". |
cookielawinfo-checkbox-necessary | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookies is used to store the user consent for the cookies in the category "Necessary". |
cookielawinfo-checkbox-others | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Other. |
cookielawinfo-checkbox-performance | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Performance". |
viewed_cookie_policy | 11 months | The cookie is set by the GDPR Cookie Consent plugin and is used to store whether or not user has consented to the use of cookies. It does not store any personal data. |