क्राइम

माता तू वैरीणी ; प्रेमात अडसर ठरणाऱ्या 3 वर्षाच्या चिमुकलीची केली हत्या 

Spread the love

नागपूर  / विशेष प्रतिनिधी  

               प्रेमात लोकं आंधळे होतात असे म्हटल्या जाते. प्रेमात पडलेल्या लोकांना बरे-वाईट याचा विसर पडतो. घरच्यांनी कितीही समजवण्याचा प्रयत्न केला तरी त्यांच्यावर त्यांच्या समजवण्याचा परिणाम होत नाही. प्रेमात आंधळी झालेल्या मातेने प्रियकराच्या मदतीने आपल्या 3 वर्षाच्या मुलीची हत्या केल्याची घटना घडली आहे. मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाटही लावली. मात्र, या हत्याकांडाची कुणकुण नागरिकांना लागली. आणि या घटनेचा भांडाफोड झाला.

 खापरखेडा पोलिसांनी पुढाकार घेऊन हे हत्याकांड उघडकीस आणले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी महिला व तिच्या प्रियकराला अटक केली. निता चामलाटे आणि (२८, नांदा) आणि राजपाल मालविय (३२, रा. देवास) अशी आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताराचंद्र चामलाटे याला दोन बायका आहेत. त्याची दुसरी बायको ही निता असून तिला तीन वर्षाची मानसी नावाची मुलगी होती. आहे. निता ही पतीसह खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत नांदा गावात कामानिमित्ताने आली होती. दरम्यान, तेथेच कामाच्या शोधात आलेला युवक राजपाल मालविय याच्याशी तिची ओळख झाली. काही दिवसांत दोघांचे सूत जुळले. ताराचंद्रला दारुचे व्यसन होते. त्यामुळे तो नेहमी दारुच्या नशेत असल्यानंतर राजपाल घरी येत होता. त्यामुळे दोघांचे अनैतिक संबंध वाढले. मात्र, त्यांच्या प्रेमसंबंधात तीन वर्षीय मुलगी मानसी ही अडसर ठरत होती. तसेच पत्नीचे राजपालशी अनैतिक संबंध असल्याची माहिती पती ताराचंद्रला लागली. त्यामुळे त्याने आपले मूळ गाव भंडारा गाठले. प्रियकर राजपालने तिला लग्नाची मागणी घातली. मात्र, तीन वर्षीय मुलगी पतीकडे किंवा कुटुंबियांकडे ठेवण्याची अट त्याने ठेवली. भंडारा जिल्ह्यात राहायला गेलेल्या पतीकडे मुलीला ठेवणे शक्य नसल्यामुळे निता अडचणीत आली. राजपाल आणि निताने मुलीचा खून केला. तिची विल्हेवाट भंडारा जिल्ह्यात लावली. मात्र, पोलिसांनी या हत्याकांडाचा छडा लावला. गुन्हा दाखल करुन दोघांनाही खापरखेडा पोलिसांनी अटक केली.

प्रियकराच्या मदतीने मुलीचा केला खून

निता आणि राजपाल यांनी मुलीचा खून करुन नव्याने संसार थाटण्याचा निर्णय घेतला. २६ डिसेंबरला मुलीच्या डोक्यात काठी मारुन तिचा खून करुन अपघात झाल्याचा बनाव केला. मुलीचा मृतदेह पहिला पती ताराचंद्र याच्या घरी नेला. मुलगी घराच्या छतावरुन खाली पडून जखमी झाली. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले. त्यानंतर गावात मुलीचा अंत्यसंस्कार करण्यात आला. सर्व काही कटानुसार व्यवस्थित झाल्याने निता आणि तिचा प्रियकर आनंदित होते.

असे आले हत्याकांड उघडकीस

ताराचंद्रची दुसरी बायको कल्पना हिला मुलीच्या अपघाती मृत्यूवर संशय आला. मुलीच्या शरीरावर चटके दिल्याचेही व्रण कल्पना हिला दिसले होते. मात्र, कुटुंबियांच्या भीतीपोटी तिने याबाबत संशय व्यक्त केला नाही. मुलीवर अंत्यसंस्कार केल्यानंतर निता लगेच प्रियकरासह निघून गेली. कल्पना हिने गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. गोंदीयातील उपविभागीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पुरलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला. पोलिसांनी निताला ताब्यात घेऊन खाक्या दाखवल्या. निताने प्रियकराच्या मदतीने खून केल्याची कबुली दिली. खापरखेडा पोलिसांनी निता व राजपाल यांना अटक केली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close