क्राइम

मुंब्रा मध्ये मेरठ ड्रम कांड ची पुनरावृत्ती , हत्या करून मृतदेह ड्रम मध्ये 

Spread the love

मुंब्रा / विशेष प्रतिनिधी

                         मुंब्रा मध्ये मेरठ ड्रम कांडा ची पुनरावृत्ती घडली आहे. येथील एका महिलेने पती आणि भावाच्या मदतीने प्रियकराची हत्या केली आहे. मृतदेह ड्रम मध्ये भरून विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. अरबाज खान असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. दादरला जात असल्याचे सांगून घरी न परतलेल्या अरबाज चा शोध घेतला.पण तो मिळून न आल्याने कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तांत्रिक तपास केला असता अरबाज ची हत्या झाल्याचे समोर आले.

मिळालेल्या माहितीनुसार, अरबाज खान 3 एप्रिल 2026 रोजी घरातून ‘पैसे आणण्यासाठी दादरला जातो’ असे सांगून बाहेर पडला होता. मात्र, बराच वेळ होऊनही तो घरी न परतल्याने त्याच्या कुटुंबीयांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी तांत्रिक तपासाला सुरुवात केली होता. त्यावेळी अरबाजच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन पालघर जिल्ह्यातील बोईसर येथे दिसून आले. याच लोकेशनवर त्याची प्रेयसी महजबीन हिचेही वास्तव्य असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलीसांनी सापळा रचला. माहिती मिळवली. त्यानंतर प्रेयसी महजबीन हीला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले.

– Work From Home: आठवड्यातून दोन दिवस ‘वर्क फ्रॉम होम’, मंत्री- अधिकाऱ्यांना ‘मंडे मेट्रो’, नवी नियमावली जाहीर

संशयावरून पोलिसांनी महजबीनला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या महजबीनने अखेर गुन्ह्याची कबुली दिली. खंडणीच्या पैशांवरून झालेल्या वादातून तिने पती आणि भावाच्या मदतीने अरबाजचा काटा काढल्याचे तपासात समोर आले आहे. आधी त्याला बोईसर येथे बोलावण्यात आले. त्यानंतर त्याचा पाईपने मारहाण करण्यात आली. तो इतके मारले की त्याचा त्यात मृत्यू झाला. त्यानंतर तो लपवण्यासाठी त्यांनी ड्रमचा वापर केला. हत्या केल्यानंतर मृतदेह एका ड्रममध्ये भरून तो लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता असं तिने आपल्या चौकशीत सांगितले.

या प्रकरणातील मुख्य आरोपी महजबीनसह तिच्या पतीला आणि भावाला पोलिसांनी अटक केली आहे. “तांत्रिक तपास आणि कॉल रेकॉर्ड्सच्या आधारे आम्ही आरोपींपर्यंत पोहोचलो आहोत. पैशांचा वाद हे या हत्येमागील प्राथमिक कारण असल्याचे दिसत आहे,” अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया ढमाले यांनी दिली आहे. पोलीसांना काही तासात की केस सोडवण्यात यश आले. मात्र या केसच्या निमित्ताने मेरठ प्रकरणाची पुनरावृत्ती झाल्याची चर्चा परिसरात रंगली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close