क्राइम

हडपसर रुग्णालय बॉम्ब प्रकरणात ATS ला मोठे यश 

Spread the love
आरोपीला नागपूर येथून घेतले ताब्यात ? 
नागपूर / विशेष प्रतिनिधी 
         हडपसर येथील एका रुग्णालयात बॉम्ब ठेवल्याच्या प्रकरणात ATS ला मोठे यश मिळाले असून ATS ने या प्रकरणातील आरोपीला नागपूर रेल्वे स्टेशन वरून अटक केली आहे. आरोपीचे नाव शिवाजी राठोड असल्याचे समजते.
 आरोपी आझाद हिंद एक्सप्रेसने प्रवास करत असल्याची गुप्त माहिती तपास यंत्रणांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने आधीच सापळा रचला होता. ही गाडी जेव्हा नागपूर येथील फलाट क्रमांक सहावर पोहोचली, तेव्हा डब्यातून खाली उतरताच दबा धरून बसलेल्या अधिकाऱ्यांनी त्याला चारही बाजूंनी घेरले आणि झडप घालून ताब्यात घेतले.
अटकेची ही कारवाई अतिशय वेगाने आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडली. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये याची पूर्ण काळजी घेण्यात आली होती. सध्या या राठोड नावाच्या संशयिताला पुढील सखोल चौकशीसाठी नागपूर एटीएसच्या मुख्यालयात नेण्यात आले आहे. तिथे अधिकाऱ्यांकडून त्याची कसून विचारपूस सुरू आहे.
 प्राथमिक चौकशीतच त्याने पुण्यातील गुन्ह्याची कबुली दिल्याचे वृत्त धडकले आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close