क्राइम

मुलीच्या वागण्यात बदल पाहून आईने लावला CCTV कॅमेरा

Spread the love

मुलीच्या वागण्यात बदल पाहून आईने लावला CCTV कॅमेरा त्यात जे दिसले ते पाहून तिला बसला धक्का

नागपूर / क्राईम रिपोर्टर

मुलीच्या वागण्यात झालेला बदल तिची वारंवार बिघडणारी प्रकृती आणि तिच्या गुप्तांगाला होत असलेल्या जंतुसंसर्गामुळे आईला शंका आली आणि तिने नवऱ्याच्या नकळत घरी CCTV बसवला.आणि त्यात जे दिसले ते पाहून तिला जबरदस्त धक्का बसला. कारण मुलीवर तिचा बापच लैंगिक अत्याचार करत होता. आणि भितीपोटी मुलीने हे कोणालाच सांगितले नव्हते.

आरोपी मागील तीन महिन्यांपासून तिच्यावर वारंवार अत्याचार करत होता. मात्र मुलीनं वडिलांच्या भीतीपोटी ही बाब कुणालाही सांगितली नव्हती.

मात्र बापाकडून सुरू असलेल्या अत्याचारामुळे तिच्या प्रकृती बिघाड होत होता. शिवाय तिच्या गुप्तांगाला जंतूसंसर्गही होत होता. ही बाब लक्षात आल्यानंतर आपल्या मुलीसोबत काहीतरी चुकीचं घडत असल्याचा संशय आईला आला. त्यामुळे तिने गुपचूप आपल्या घरात सीसीटीव्ही कॅमेरा लावला. ज्यामध्ये हा संतापजनक प्रकार कैद झाला. याप्रकरणी पाचपावली पोलिसांनी नराधम बापाला अटक केली आहे.आईचा संशय बळावला आणि सीसीटीव्हीतून बिंग फुटलं

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित १० वर्षीय चिमुकली आपल्या कुटुंबासह पाचपावली परिसरात भाड्याच्या घरात राहत होती. तिची आई एका खासगी रुग्णालयात केअरटेकर म्हणून काम करते, तर तिचा जन्मदाता पिता हा मेकॅनिक म्हणून काम करतो. या दाम्पत्याचा विवाह २०१३ मध्ये झाला होता, त्यांना १३ वर्षांचा मुलगा आणि १० वर्षांची मुलगी अशी दोन अपत्ये आहेत. गेल्या काही महिन्यांपासून पती-पत्नीमध्ये वाद सुरू होता.

दरम्यान, १० वर्षीय मुलीच्या गुप्तांगाला वारंवार जंतू संसर्ग होत असून तिच्या गुप्तांगातून रक्तस्राव होत असल्याचं आईच्या निदर्शनास आलं. मुलीच्या वारंवार होणाऱ्या शारीरिक त्रासामुळे आईचा संशय बळावला. हा प्रकार नेमका कशामुळे होतोय हे पाहण्यासाठी आईने घरात एक गुप्त सीसीटीव्ही कॅमेरा लावला. रविवारी या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता, नराधम बाप हाच आपल्या १० वर्षीय मुलीवर बळजबरीने अत्याचार करत असल्याचं दृश्यात स्पष्ट दिसून आलं.पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत केली अटक

घरात घडलेला हा भयानक प्रकार पाहिल्यानंतर आईच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने क्षणाचाही विलंब न करता तत्काळ पाचपावली पोलीस ठाणे गाठले आणि पतीविरुद्ध रीतसर तक्रार दाखल केली. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या पुराव्यांच्या आधारे तत्काळ कारवाई करत नराधम बापाविरुद्ध पोक्सो कायद्यासह गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल केला आणि त्याला त्वरित बेड्या ठोकल्या.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close