राजकिय

अजित दादांचा अपघात नव्हे तर घातपात – उमेश पाटील

Spread the love

मुंबई / विशेष प्रतिनिधी

 अजित पवारांच्या अपघाती निधनावरून रामदास कदम यांनी अलीकडेच घातपाताचा संशय व्यक्त केला होता. कदम यांच्या या विधानानंतर अजित पवारांच्या मृत्यूबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

त्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील यांनीही खळबळजनक आरोप केला आहे. अजितदादांचा अपघात नव्हे तर घातपातच होता असं विधान उमेश पाटील यांनी केले आहे.

माध्यमांशी बोलताना उमेश पाटील म्हणाले की, अजितदादा राजकारणात होते पण राजकारणी नव्हते. ते सरळ होते हीच दादांची ओळख होती. कदाचित दादा राजकारणी नसल्यामुळेच त्यांचे मोठे नुकसान झाले. अजितदादांचा हा अपघात होता की घातपात याबाबत सातत्याने मांडणी केली जाते. मात्र हा घातपातच आहे असं मला वाटते. त्याच्या खोलात गेल्यावर अनेक बाबी कळतील पण हा अपघात नव्हता, तो घातपातच आहे असं मला वाटते हे त्यांनी सांगितले.

तसेच ज्याने कुणी हे केले देव त्याला माफ करणार नाही. मी दादांच्या स्मृतीस्थळीच आहे. दादा कदाचित त्याला माफ करतील पण जनता माफ करणार नाही. दादांवर महाराष्ट्रातील जनतेचे प्रचंड प्रेम होते. लोकांना त्यांच्या निधनाने इतक्या यातना झाल्या आहेत, हा सगळा तळतळाट ज्याने कुणी केले असेल त्याच्या ७ पिढ्यांना भोगावा लागेल असं उमेश पाटील यांनी म्हटलं.

दरम्यान, अजित पवारांच्या अपघाती मृत्यूच्या तपासात मध्यंतरी प्रगती झाली आहे. त्या तपासाच्या प्रक्रियेत कुठलाही अडथळा नको म्हणून आम्ही यावर भाष्य करणे टाळतो. दादांच्या अपघाताचा तपास जाहीरपणे माध्यमांत चर्चेचा विषय नाही तर तपास पूर्ण होऊन त्यातील सत्य बाहेर येण्याचा विषय आहे. आम्ही २०-२५ वर्ष सामाजिक जीवनात, राजकारणात आहोत. जेव्हा एखादी घटना घडते त्यामागे काय काय कारणे असतात, त्याची तर्कसंगती जोडली तर निश्चितपणे हा घातपात असावा असं वाटते असं उमेश पाटील यांनी माध्यमांना सांगितले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close