क्राइम

तहसील कार्यालयाच्या आवारात लाच घेताना तलाठी गौरव लांजेवारला  लाच लुचपत विभागाकडून अटक  

Spread the love
मोर्शी / प्रतिनिधी
             घराचा सातबारा ठीक करण्यासाठी संबंधितांकडून 2000 रु. ची लाच घेतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने टाळतजी गौरव लांजेवार याला रंगेहाथ पकडून अटक केली आहे.
                 या बाबत अधिक माहिती अशी की ,  या प्रकरणातील तक्रारदार यांचे मोर्शी येथील समर्थ कॉलोनी येथे  घर आहे. परंतु  7/ 12 चुकीचे क्षेत्रफळ दर्शविल्याने ते दुरुस्त करण्यासाठी तक्रारदार यांनी  तहसील कार्यालयात अर्ज केला होता.  दुरुस्ती साठी तलाठी लांजेवार यांनी 3 हजार  रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती 2500 रुपयात बोलणी झा(ली होती. त्यापैकी 500 रुपये पूर्वी देण्यात आले होते. उर्वरित रकम 2000 आज  सत्यासाईबाबा उपहार गृह, सम्राट बार च्या खाली , तहसील कार्यालया जवळ  सापळा कार्यवाही दरम्यान स्वीकारले. वरून आलोसे यांना लाच रकमेसह ताब्यात घेण्यात आले असून त्यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन मोर्शी , जिल्हा अमरावती ग्रामीण येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
                  सदरची कारवाई मा. श्री. मारुती जगताप, पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्र, अमरावती.
श्री. देविदास घेवारे, अप्पर पोलिस अधीक्षक, ला.प्र.वि.अमरावती परिक्षेत्र, अमरावती. श्री शिवलाल भगत, पोलीस उपअधीक्षक, अमरावती घटक, अमरावती, यांच्या मार्गदर्शनात  पो. नि. अमोल कडू ला.प्र.विभाग,अमरवती यांनी केली  या कारवाईत ,योगेशकुमार दंदे  , पोलीस निरीक्षक,
पोशि- शैलेश कडू पोशि – आशिष जांभळे ,पोशि – उमेश भोपते ,पोशि – उपेंद्र थोरात चालक पोहेका – चंद्रकांत जनबंधू ला.प्र.विभाग.अमरावती
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close