शैक्षणिक

लाहोटी महाविद्यालयात कौशल्य विकास योजना कार्यशाळा संपन्न

Spread the love

मोर्शी / तालुका प्रतिनिधी

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या निर्देशनानुसार करिअर समुपदेशक स्पर्धात्मक परीक्षा आणि मार्गदर्शन कक्षांच्या अंतर्गत श्री आर. आर. लाहोटी विज्ञान महाविद्यालयात कौशल्य विकास योजना कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली.
श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित श्री आर. आर. लाहोटी विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या हिताकरिता विविध उपक्रम राबविले जातात. शिक्षणासोबतच विद्यार्थांना कौशल्याचे धडे मिळावे या उद्देशाने ‘महाविद्यालयात कौशल्य विकास योजना कार्यशाळा घेण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी.एन.चौधरी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ आतिष कोहळे, महाविद्यालयाचे विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. रवी धांडे हे होते.
या कार्यशाळेच्या पहील्या दिवशी डॉ. आर.जी.बोबडे यांनी प्रेरणा आणि ध्येयनिश्चिती या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, तर दुसऱ्या दिवशी मौखिक संवाद व सादरीकरण कौशल्य तसेच तिसऱ्या दिवशी वेळेचे व्यवस्थापन व गटचर्चा तसेच चौथ्या दिवशी नैतिक चारित्र्य व नैतिकता या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेच्या
समन्वयक म्हणून डॉ. सोनल बाकडे तसेच समिती सदस्य यांनी कामकाज पाहले. या कार्यशाळेला महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close