क्राइम

जालना जिल्ह्यातून लव्ह जिहाद च भयंकर प्रकरण आलं समोर 

Spread the love
भोकरदन ( जालना ) / विशेष प्रतिनिधी

                    जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथून लव्ह जिहाद च भयंकर आणि संताप निर्माण करणार प्रकरण उघड झाल आहे. येथे एका 37 वर्षीय मुस्लिम तरुणाकडून तिच्यावर सन 2016 पासून लैंगिक अत्याचार केले जात होते.

इतकच नव्हे तर तिला मुस्लिम धर्म स्वीकारण्यास भाग पाडलं जात होतं. त्यासाठी कुराण पठण, तर कधी बुरखा घालण्याची सक्तीही केली जात होती. शेवटी हा त्रास असह्य झाल्यानंतर पीडित तरुणीने तब्बल दहा वर्षानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पीडित तरुणीच्या तक्रारीवरून भोकरदन तालुक्यातल्या पारद पोलीस ठाण्यात चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

शेख इमरान शेख हबीब, शेख हबीब, शेख बानू शेख हबीब, शेख जुनेद शेख हबीब अशी या चार आरोपींची नावे आहेत. त्यांना जालनाच्या न्यायालयामध्ये आज हजर करण्यात आले. त्यानंतर त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणाची सुरूवात 2016 साली झाली. पीडित तरुणी त्यावेळी 9 वी इयत्तेत शिकत होती. ती घरी अंघोळ करत होती. त्यावेळी घरात कोमी नव्हते. याचा गैरफायदा घेती तिच्या शेजारी राहाणारा शेख इमरान हा तिच्या घरात घुसला. त्याने तिचे नग्ना अवस्थेतील फोटो काढेल. शिवाय ते फोटो तिला दाखवले. मी सांगेन ते ऐकले नाहीस तर तुझे हे फोटो तुझ्या शाळेत दाखवीन अशी धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

पुढे ही तरुणी अकरावीला शिकण्यासाठी संभाजीनगर येथे गेले. त्यावेळी ती अवघ्या सोळा वर्षांची होती. त्याच वेळी इमरान ही तिथे गेला. तिला तो आपल्या सोबत एका नातेवाईकाच्या घरी घेवून गेला. तिथेच त्याने पहिल्यांदा तिच्या सोबत शरीस संबंध प्रस्थापित केले. ते वर्ष 2018 होतं. त्यानंतर या गोष्टी कधीत थांबल्या नाहीत. तो वारंवार तिच्यासोबत शरीर संबंध प्रस्थापित करत होता. भितीमुळे तो ज्या वेळी बोलवायचा त्यावेळी आपल्याला जावं लागायचं असं पीडितेने तक्रारीत म्हटलं आहे. याच कालावधीत त्याने कुरणा पठणासाठी दबाव टाकला. कुराणच्या प्रति तिला वाचनासाठी दिल्या. मराठी प्रत ही दिल्याचं तिने सांगितलं आहे. व्हिडीओ कॉल करून ते कुराणी शिकवायचा. त्याच बरोबर सौदी मध्ये नोकरी लावून देईन असं आश्वासन ही त्याने पीडित तरुणीला दिलं होतं.

ऐवढे पुरं नव्हतं म्हणून की काय ती घरापासून लांब होती. त्या दोघांची भेटी होत नव्हत्या त्यावेळी तो तिला व्हिडीओ कॉल करत असत. शिवाय व्हिडीओ कॉलवर तिला नग्न होण्यास सांगत असतं. तो जसं सांगत होता तसं आपल्याला करावं लागत होतं असं ही तिने तक्रारीत म्हटलं आहे. शिक्षण झाल्यानंतर ती गावी परतली होती. त्यावेळी इमरान तिला आपल्याघरी घेवून गेला होता. तिथे त्याच्या कुटुंबीयांनी तिला बुरखा घालायला सांगितला. त्यावेळी तिच्या अंगावरचे कपडे ही काढले. पुढे गावात असल्यामुळे तो नेहमीच शरीरसंबंध करू लागला असं पिडीतेने तक्रारीत सांगितलं आहे. पुढे पीडित तरुणीचं कुटुंब जांगडानगर इथं राहाण्यासाठी गेलं. तिथं ही इमरान आला. यावेळी त्याने तिला मारहाण केली. शिवाय दिवसभर बळजबरीने शरीरसंबंध ठेवले असं तिने आरोप केला आहे.

आपले फोटो व्हिडीओ व्हायरल होतील या भीतीने ही तरुणी सर्व काही सहन करत होती. जवळपास दहा वर्षी तिच्यावर इमरान अत्याचार करत होता. समाजात आपली इज्जत जाईल या भीतीने ती शांत होती. त्यामुळे तिने कोणती ही तक्रार केली नाही. शिवाय इमरानकडे तिचे आक्षेपार्ह व्हिडीओ आणि फोटो होते. याची तिला कल्पना होती. विशेष म्हणजे ही तरुणी इंजिनिअर आहे. ती आता बँकींगच्या परिक्षेची तयारी ही करत आहे. अशा वेळी तिला आपल्यावर अत्याचार होत आहेत. ते असह्य आहेत हे समजल्यावर ही बाब तिने पालकांना सांगितली. त्यानंतर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी केली जात आहे. या प्रकरणाने संपूर्ण जिल्हा हादरला आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close