हटके

असला नवरा नको ग बाई म्हणत मुलीचा लग्नास नकार ; वरात परत पाठवली

Spread the love

स्टेजवर वरमाला टाकण्याच्या वेळी नवरीने दिला लग्नास नकार : त्यामुळे दोन्ही पक्षात जुंपली

शेरपूर / नवप्रहार न्यूज नेटवर्क 

              लग्न म्हटलं की दोन्ही (वर – वधू) मंडळी कडे लग्नाची धामधूम असते. वरात येणार असल्याने मुलीकडील मंडळी नवरा मुला कडील मंडळीच्या आवभक्तीसाठी सुसज्ज असते. या प्रकरणात सुद्धा नवरा मुलगा वरात घेऊन आल्यावर मुलीकडील मंडळीने त्यांचे स्वागत केले. नाश्ता,- चहापाणी आटोपल्यावर सगळे लग्नाच्या तयारीला लागले. नवरी मुलगी स्टेजवर आली . एकमेकांच्या गळ्यात हार टाकण्याची प्रक्रिया सुरू असताना मुलीने लग्नास चक्क नकार दर्शविला. मुलगा वयस्कर आणि सावळा असल्याचे करण सांगत तिने लग्नाला नकार दिला. माहेरच्या मंडळीने तिची समजूत काढण्याचा खूप प्रयन्त केला . पण ती आपल्या निर्णयावर ठाम होती. लग्न मोडल्याच्या कारणावरून नवऱ्या मुओकडे मंडळी संतप्त झाली. आणि दोन्ही पक्षात वाद उफाळला.

त्याचवेळी अनेकांनी नवरीला समजावण्याचा प्रयत्न केला. आई, वडील, बहीण, नातेवाईक आणि मैत्रीणींनी तिला प्रचंड समजावले. नवरदेवाच्या नातेवाईकांनीही तिला समजावण्याचा प्रयत्न केला. पण नवरी काही ऐकायला तयार नव्हती. अखेर नवरदेवाला नवरीशिवाय आपली वरात परत न्यावी लागली.

29 मे रोजी ही घटना घडली. पिपरी पोलीस ठाणे क्षेत्रातील शेरपूरमध्ये राहणाऱ्या तरुणाचे लग्न चरवा पोलीस ठाणे परिसरातील एका गावातील तरुणीशी विवाह ठरला होता. 29 मे रोजी नवरदेव वरात घेऊन लग्न मंडपात गेला. नवरीच्या घरच्यांनी नवरदेवाचं स्वागत केलं. त्यानंतर नवरदेव स्टेजवर आला आणि मुख्य लग्न सोहळ्याला सुरुवात होणारच होती. तोच नवरीने नवरदेव सावळा असल्याचं सांगत लग्न न करण्याचा हट्टच धरला. त्यामुळे एकच गोधळ निर्माण झाला. वऱ्हाडी मंडळींनाही धक्का बसला. होणाऱ्या पत्नीने लग्नातच लग्नाला नकार दिल्याने नवरदेवलाही धक्का बसला. मुलीच्या या निर्णयाने तिचे आईवडील आणि घरातील मंडळीही घाबरून गेले. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत तिची समजूत काढली जात होती.

पंचायत येऊनही उपयोग नाही

नवरी ऐकत नसल्याने अखेर पंचायत बोलावली. पंचायतीनेही नवरीला समजावण्याचा प्रयत्न केला. तिने नवरदेवाच्या गळ्यात वरमाला टाकावी म्हणून अनेक प्रयत्न केले गेले. पण नवरी तिच्या निर्णयावर अडून बसली. त्यामुळे पंचायतीनेही तिच्यासमोर हात टेकले. अखेर नवरी शिवाय वरात पुन्हा गेली. मुलीच्या या भूमिकेने नवरीच्या घरचेही हिरमसून गेले होते.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close