आध्यात्मिक

या मंदिरात सहा महिन्या नंतरही फुले राहतात ताजे आणि दिवा राहतो पेटत

Spread the love

                 भारतात अशी काही मंदिरे आणि स्थान आहेत की तेथील रहस्य उलगडण्यात वैधानिकांना देखील यश आले नाही. वैधानिकांनी अनेक वर्ष रिसर्च करून रहस्य शोधण्याचा प्रयत्न केला. पण शेवटी कंटाळून त्यांनी शोध घेणेच बंद करून दिले. असे नाही की शोध पूर्णतः बंद झाला. काही नवीन संशोधक रहस्य शोधण्याचा प्रयत्न करतात.पण शेवटी त्यांच्या हाती निराशाच येते.

 असेच एक मंदिर बद्रीनाथ येथे आहे. उत्तराखंडमधील हिमालयीन कुशीत वसलेले बद्रीनाथ मंदिर हे भगवान विष्णूंच्या परम भक्तांसाठी श्रद्धेचे सर्वोच्च स्थान आहे. बद्रीनाथ धामचे कपाट भाविकांसाठी उघडले असून अधिकृतपणे चारधाम यात्रेला सुरुवात झाली आहे.

अलकनंदा नदीच्या काठावर वसलेले हे मंदिर ‘बद्री विशाल’ म्हणून ओळखले जाते. भगवान विष्णूंनी येथे कडक तपस्या केली होती, अशी मान्यता आहे. मात्र, या मंदिराशी संबंधित अशी काही रहस्ये आहेत, जी विज्ञानाच्या पलीकडची आहेत.

शंख वाजवण्यास सक्त मनाई
बद्रीनाथ मंदिरात शंख वाजवणे पूर्णपणे वर्जित आहे. यामागे दोन कारणे सांगितली जातात. पौराणिक कथेनुसार, जेव्हा माता लक्ष्मी येथे तुळशीच्या रूपात ध्यान करत होत्या, तेव्हा भगवान विष्णूंनी ‘शंखचूर्ण’ नावाच्या राक्षसाचा वध केला. लक्ष्मीच्या ध्यानात व्यत्यय येऊ नये म्हणून विष्णूंनी विजयानंतरही शंख वाजवला नाही. वैज्ञानिक दृष्टिकोनातून, हिमालयातील या भागात शंख वाजवल्याने होणाऱ्या ध्वनी लहरींमुळे बर्फाचे कडे कोसळण्याचा धोका असतो.

नर आणि नारायण पर्वतांचे रहस्य
हे मंदिर ‘नर’ आणि ‘नारायण’ नावाच्या दोन पर्वतांच्या मध्ये स्थित आहे. असे मानले जाते की, हे दोन पर्वत भगवान विष्णूंचे दोन अंश आहेत. पुराणात असे भाकीत केले आहे की, कलियुगाच्या अंती हे दोन्ही पर्वत एकमेकांना मिळतील आणि बद्रीनाथचा मार्ग कायमचा बंद होईल. त्यानंतर ‘भविष्य बद्री’ नावाचे नवीन तीर्थस्थान उदयास येईल.

मंदिराचे दरवाजे 6 महिने बंद 6 महिने खुले
बद्रीनाथचे दरवाजे वर्षातील केवळ 6 महिने उघडले जातात. हिवाळ्यातील 6 महिने मंदिर बर्फाच्छादित असते. विशेष म्हणजे, जेव्हा हिवाळ्यात दरवाजे बंद केले जातात, तेव्हा मंदिरात एक अखंड दिवा लावला जातो. 6 महिन्यांनंतर जेव्हा पुन्हा दरवाजे उघडले जातात, तेव्हा तो दिवा तसाच प्रज्वलित असतो आणि मंदिरात पूजेचे ताजे साहित्य आढळते, 6 महिने मंदिर बंद तरी वाहिलेली फुलं राहतात ताजी, जणू काही तिथे कोणीतरी नियमित पूजा करत होते. असे मानले जाते की, हिवाळ्यात ‘नारद मुनी’ आणि इतर देव या मंदिराची पूजा करतात.

तुळशीचा हार
भगवान विष्णूंना तुळस प्रिय आहे, परंतु बद्रीनाथ मंदिरात नारायणाला तुळशीऐवजी तुळशीचाच हार अर्पण केला जातो. तुळशीचे हे रोप फक्त याच उंचीवर वाढते आणि त्याला एक विशिष्ट सुगंध असतो.

भगवान बद्रीनाथांची मूर्ती
बद्रीनाथ मंदिरातील भगवान विष्णूची मूर्ती शालिग्राम शिळेत कोरलेली असून ती चतुर्भुज ध्यानमुद्रेत विराजमान आहे. असे म्हटले जाते की, भक्त बद्रीनाथ धामात जी काही इच्छा व्यक्त करतात, ती नक्कीच पूर्ण होते. बद्रीनाथ धामाला भेट देणाऱ्या भक्तांना भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांचा आशीर्वाद नेहमीच लाभतो.

शंकराचार्यांकडून मूर्तीची पुनर्स्थापना
आख्यायिकेनुसार, शंकराचार्यांना अलकनंदा नदीत शालिग्राम दगडापासून बनवलेली भगवान बद्री नारायणाची एक काळ्या पाषाणाची मूर्ती सापडली. त्यांनी सुरुवातीला ती तप्त कुंड येथील गरम पाण्याच्या झऱ्यांजवळील एका गुहेत स्थापित केली. सोळाव्या शतकात, गढवालच्या राजाने ती मूर्ती मंदिराच्या सध्याच्या ठिकाणी हलवली.

बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे तीन चाव्यांनी उघडतात
बद्रीनाथ धाम मंदिराचे दरवाजे एका चावीने नव्हे, तर तीन चाव्यांनी उघडतात आणि या तीन चाव्या वेगवेगळ्या लोकांकडे आहेत.

मंदिराचे रक्षक ‘घंटकर्ण’
बद्रीनाथ धामचे द्वारपाल, घंटकर्ण, हे भगवान शिवाचे परम भक्त मानले जातात. मंदिर उघडण्यापूर्वी त्यांची परवानगी आणि पूजा अनिवार्य मानली जाते. आख्यायिकेनुसार, बद्रीनाथमध्ये ज्या ठिकाणी भगवान नारायणांनी तपश्चर्या केली होती, त्याच ठिकाणी घंटाकर्णानेही तपश्चर्या केली. यानंतर, घंटाकर्णाच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन भगवान श्रीकृष्ण त्याला दर्शन देऊन बद्रीनाथ धामचे रक्षक म्हणून नियुक्त केले.

भविष्य बद्री
आख्यायिकेनुसार, कलियुगाच्या शेवटी जेव्हा नर आणि नारायण पर्वत विलीन होतील, तेव्हा बद्रीनाथचा मार्ग बंद होईल. यानंतर, जोशीमठजवळ असलेल्या भविष्य बद्री नावाच्या ठिकाणी भगवान बद्रीनाथांची पूजा केली जाईल.

तप्त कुंड
मंदिराच्या अगदी खाली ‘तप्त कुंड’ नावाचा एक नैसर्गिक गरम पाण्याचा झरा आहे. बाहेरचे तापमान गोठणबिंदूच्या खाली गेले तरी, या कुंडातील पाणी सातत्याने गरम राहते, ही एक चमत्कारिक गोष्ट आहे.

टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. सा. नवप्रहार याची पुष्टी करत नाही. आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close