महिला पतंजली योग समिती नेर तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त योग रत्न पुरस्काराने सन्मानित
आदरणीय संजीवनी ताई माने यांचा सत्कार व योग विषयक मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

नेर परसोपंत ग्रामिण प्रतिनिधी / रेणुका जयस्वाल
नियमित योग निरोगी जीवन जगण्यासाठी आवश्यक आहे . स्त्री शक्ति वर सर्व कुटुंबाची जबाबदारी आहे सोबतच बाहेरील क्षेत्रात कार्यरत असलेल्या स्त्रियांना मनाने आनंदित राहण्यासाठी, कार्यक्षमता वाढविण्यासाठी तसेच स्वस्थ आरोग्यासाठी योग व प्राणायाम या शिवाय पर्याय नाही असे वक्तव्य आदरणीय संजीवनी ताई माने यांनी केले.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ.माधुरी ताई वानरे प्रमुख सत्कार मूर्ती आदरणीय संजीवनी ताई माने प्रमुख अतिथीआदरणीय दिनेश राठोड, अतिथी आदरणीय माया ताई चव्हाण, प्रतिभा ताई खसाडे, संजय जी चाफले, नगराध्यक्ष सुनिता ताई जयस्वाल, लक्ष्मनराव खांडरे वैशाली ताई मासाळ, शोभा ताई कोठारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छाया ताई नाहले प्रास्ताविक adv. रश्मी पेटकर व आभार प्रदर्शन पुष्पा ताई दरोई यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रिया ताई धोटकर लता ताई काळे पुजा परतवार रेणुका ताई जैसवाल, सोनू वानखडे, वैशाली गुल्हाने रेणुका गायकवाड,जया ईसुणे सुनंदा चव्हाण, संगीता इंगळे, प्रेमा बुरखंडे, सारिका महलेअ्रना ईसाळकर यांनी प्रयत्न केले. 🙏🙏