अपघात

चालत्या दुचाकीवर कोसळली वीज ; शिक्षकाचा मृत्यू 

Spread the love

नांदेड / नवप्रहार  ब्युरो 

          राज्यात सध्या सगळीकडे अवकाळी पाऊस पडत आहे. रखरखत्या उन्हात एकीकडे शरीराची लाहीलाही होत आहे. अश्यातच पाऊस पडत. यात भिजायला अनेकांना आवडते. तर काहींना लपायला जागा नसल्याने मजबुरीत त्यांना प्रवास करावा लागतो. पावसात दुचाकी ने प्रवास करत असलेल्या  शिक्षकाच्या अंगावर विज कोसळल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.

.. नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील मालवाडा घाटात आज दुपारी 3 वाजता वीजांच्या कडकडाटासह किरकोळ पाऊस झाला. मात्र, वादळी वारा आणि वीजांच्या कडकडाटाने परिसरात हादरुन गेला होता. या दरम्यान आपल्या करंजी या गावाकडे शिक्षक संजय पांडे दुचाकीवरुन जात होते. दुर्दैवाने त्याचवेळी त्यांच्या अंगावर वीज कोसळली, त्यात संजय पांडे यांचा रस्त्यातच मृत्यू झाला. या घटनेनंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, खिशातील मोबाईलचा डाटा चालू असल्याने त्यांच्या अंगावर वीज पडल्याची चर्चा परिसरात होत आहे. मात्र, तसा दावा कुठल्याही संबंधित यंत्रणेने किंवा पोलिसांनी केला नाही. दरम्यान, पावसाळी वातावरणात मोबाईलचा वापर टाळण्याचे आवाहन प्रशासन करत असतं. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने ही घटना घडल्याची देखील चर्चा गावपरिसरात होत आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close