हटके

खरंच महाराष्ट्राचा बिहार बनतोय का ? विद्यार्थ्यांच्या बॅगेत सापडले पिस्तुल आणि काडतुसे

Spread the love

बुलढाणा / नवप्रहार न्यूज नेटवर्क 

              खामगाव येथील वस्तीगृहात वास्तव्यास असलेल्या विद्यार्थ्या कडे पिस्तुल आणि जिवंत काडतुसे सापडल्याने शहरात खळबळ माजली आहे . सोबत महाराष्ट्राचा खरच बिहार होत आहे आहे का ही चिंता सतावू लागली आहे. या बातमी मुळे पालकांचे टेंशन वाढणार असून त्यांना आता जास्त सतर्क राहण्याची गरज आहे. पोलिसांनी सापळा रचत पिस्तुल आणि काडतुसे जप्त करून विद्यार्थ्याला अटक केली आहे. यामागचे कारण बातमी लिहेस्तोवर समजू शकले नव्हते.

बुलढाणा जिल्ह्यातील एका वसतीगृहातील विद्यार्थ्याकडे चक्क पिस्तूल आणि जिवंत काडतूस मिळाली आहेत. पोलिसांनी सापळा रचून संबंधित विद्यार्थ्याला ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, या घटनेमुळे खामगाव शहर परिसरात एकच खळबळ माजली आहे.

नेमका काय आहे प्रकार ?  – बुलढाणा जिल्ह्यात बीएससीचे शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याजवळ देशी पिस्तूल आणि पाच जिवंत काडतुसे आढळून आले आहेत. या विद्यार्थ्याने देशी पिस्तूल आणि जिवंत काडतूस घेऊन थेट वस्तीगृहात प्रवेश केला होता. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून या विद्यार्थ्याच्या वस्तीगृहातील खोलीची झाडाझडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी कट्टा आणि पाच जिवंत काडतुसे आढळून आली आहेत. नितीन भगत असं 21 वर्षीय या विद्यार्थ्याचं नाव आहे. पोलिसांनी देशी पिस्तूल आणि 5 काढतुसासह या विद्यार्थ्याला अटक केली आहे.

मात्र, शिकत असणाऱ्या नितीनकडे ही बंदूक आलीच कशी आणि त्याने कोणत्या कारणासाठी ही बंदूक वस्तीगृहात आणली? याचा तपास आता खामगाव पोलीस करताना पाहायला मिळत आहेत. मात्र, शिक्षण घेण्याच्या वयात या विद्यार्थ्याकडे बंदूक आलीच कशी? असा प्रश्न सर्वसामान्य विचारात आहेत. त्यामुळे खामगाव शहर परिसरात एकच खळबळ माजली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close